संस्थेला नाशिक शहरात भाविक भक्तांकडून मिळत असलेल्या प्रतिसादातून व संस्थाकरिता असलेली विविध उत्सवाचे आयोजनात अधिक पवित्त्र यावा अ भाविकांच्या सहकार्यातून व संस्थेला मिळालेल्या संकेतानुसार हा श्रीच्या रजत मुखवटा तयार करण्यात आला
दि २ मे २००४ मध्ये पेठे विद्यालय, नाशिक याठिकाणी झालेल्या श्र्र्च्य पारायण सोहळ्यात श्रीगजानन महाराजांचा शेगांव प्रमाणे चांदीचा मुखवटा बनविनाच्या संकल्प मांडण्यात येउन भक्तानां आवाहन करून निधी गोळा करण्यात सुरुवात झाली. या पारायण सोहळ्यात कुणाकडेही न मागता जागेवरच ८० ते ९० हजारांचा निधी जमा झाला. मध्यंतरी चांदीच्या भाव वाढीमुळे मुखावात्याचे बजेट १.५ लाख पर्यंत गेले. संस्थेच्या सभासदांनी काही रक्कम संस्थेमध्ये जमा करून संकल्पपूर्ती केली. आधीची रक्कम ७० हजार व भक्तांनी केलेली सहकार्याने संस्थेने सव्वाअकरा किलोचा चांदीचा रजत मुखवटा २००५ मध्ये बनवला. त्यास शाक्स्त्रोत्र विधीने देवत्व प्राप्त करण्यात आले व श्रीच्या प्रगटदिनी ३ मार्च २००५ मध्ये नगरात सनईचौघडा,वाद्यारुंद, भजनी मंडळ, वारकरी ह्यांच्यासह मिरावणूक काध्यंत आली. विशेष म्हणजे त्यास देवत्व प्राप्त झाले व त्याचे अनेक भक्तांना विविध अनुभव आले.
नवरत्नांचा पारायण सोहळा-
ह. भ. प. श्री. दासगणू विरचित श्रीगजानन विजय ग्रंथ मुखोत्गात असलेले महारास्त्र न्हुसहान नऊ भक्तांना श्रीगजानन महाराजांचा कृपाशीर्वाद असल्याची माहिती सन २००९ मध्ये माहिती झाली. त्याच प्रमाणे रविवार, दि ८ मे २०११ रोजी नाशिक शहरातील पेठे विद्यालय, नाशिक येथे हा नवरत्नांचा मुखोत्गत पारायण सोहळा संपन्न झाला.
आदरणीय श्रीमती सुमतीताई बापट (नाशिक), सौ माधुरीताई पुण्यार्थी (ठाणे), श्री जयंत मराठे (सौदापूर कर्हाड), श्री सुधारकरभाऊ दीक्षित (कल्याण), श्री. प्रकाश पटवर्धन (तळेगाव दाभाडे), डॉ. गजानन खासनीस (चिंचवड पुणे), सौ अर्चनाताई देशपांडे- कुलकर्णी , कुमारी अंजलीताई कुलकर्णी (पुणे), सौ विद्याताई पडवळ (ठाणे) हे सर्व मान्यवर एकाच व्यासपीठावर प्रथमतः नाशिकमध्ये पारायण केले. या पारायणास नाशिकमधून नव्हेतर मुंबई, दादर, पुणे आदि ठिकाणावरून भक्त मंडळीचा समावेश होता.
श्री गजानन महाराज अनुभव पुस्तक –
संस्थेच्या वतीने सन २००७ मध्ये भक्तामध्ये अनुभव लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. ह्यात मोठ्या प्रमाणांत अनुभव संग्रहित झाले. या संग्रहातून गजानन महाराज अनुभवातूनच पुस्तक तयार करण्यात आले. सदर पुस्तकाचे प्रकाशन श्री गजानन महाराजांच्या पारायण कार्यक्रमातून करण्यात आले. दि ११ मे २००८ रोजी या पुस्तकाच्या १००० प्रती छापून अल्पदरात उपलभ करून देण्यात आले. त्याच मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्यामुळे पुन्हा २०१० मध्ये १००० प्रती तयार करण्यात आल्या.