विवेक, सद्विचारांनी ध्येय साध्यतेकडे वाटचाल करता येते. शेगांवचे श्री गजानन महाराज विवेकी सत्पुरुष. अविवेकांने वागणार्यांना त्यांनी कृतीतुन फटकारले. स्वतःच्या फायद्यासाठी अनेक लोक एखाद्याच्या जवळ येतात. मग तो संत असो की महात्मा. आपल्या तव्यावरची पोळी भाजून घ्यायची आणि नंतर पाहायचे पण नाही. स्वार्थसाधू, अविवेकी प्रवृत्तीचीच ही माणसं. त्यांना सद्गुणांची ती काय किंमत. म्हणून तर स्वामी गजानन म्हणतात, ऐसे न कोणी करावें संतापासी राहून बरवे तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. श्रींचा हा उपदेश तुम्हा आम्हाला सार्यांना उपयुक्त आहे. आपण विवेकाने वागलो तर विचारांची प्रगल्भता आपल्यामध्ये निर्माण होईल. आपल्या हातुन सत्कर्म घडतील. वाम मार्ग सोडून सन्मार्गावरुन मार्गक्रमण होईल. सकारात्मक विचार रुजतील. सज्जनांचा सहवास लाभेल. ज्ञान प्राप्ती होईल. आपले आयुष्य विशिष्ट ध्येयाने चालेल. मात्र त्यासाठी देखील भगवंताचे नाम मुखी सतत हवे. अन्यथा, हेच हरीचे नामस्मरण का न केले मागे जाण प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी. असै होऊ नये म्हणून सतत चांगल्याच विचारांची मनी जोपासना करायला हवी. जोपासना येईल ती परमेश्वराच्या नामस्मरणाने. तर मग विचार कसला करताय, बोला गजानन बाबा की जय. गजानन बाबाकी जय.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com