शेगांवचे श्री गजानन महाराज. अलौकीक सत्पुरुष. योग, भक्ति , कर्म यांची शिकवण देणारा खरा महात्मा. ज्यांना ज्ञानाची लालसा आहे. त्यांनी जरुर श्री गजानन विजय ग्रंथ वाचावा. श्रींचे नामस्मरण करावे. पण आपल्या भक्तीचा, श्रद्धेचा बाजार मांडू नये. कारण आपण सश्रद्ध आहोत का नाही, हे आपल्या आचरणावरून ठरणार आहे. हे किंवा ह्या, ते किंवा ती श्रींची भक्त आहे.अशी ओळख इतरांना सांगितली जाते. पण जे स्वतः भक्त ही उपाधी लावून घेत नाहीत. तेच खरे भक्त. श्रींच्या लिलाग्रंथात खर्या निस्सिम भक्तांची उदाहरणे सापडतात. त्यांनी श्रींच्या पुढ्यात सर्वस्व अर्पण केलं. आपण करू शकणार आहोत का?. मग स्वतःला श्रींचे भक्त म्हणवून घेण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा उपासक,अभ्यासक होउन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केल्यास, गजानन रुपी नौका आपल्याला ह्या भवसागरातून तारेल. योग,कर्म,भक्ती करीता मनाची सात्विकता, पवित्रता असायला हवी. अर्थात ती येईल, श्रींच्या नामस्मरणाने. बंकटलाल आगरवाल जन्मतःच गर्भश्रीमंत होते. मात्र श्रींच्या समोर त्यांना ते सारं वैभव मिथ्थ्या वाटलं. त्यावर तुळशीपत्र ठेवून फक्त आणि फक्त गजानन स्वामींना स्वतःचे जीवन अर्पण केलं, पिंपळगावला गेलेल्या महाराजांना शेगांवी परत आणताना ते म्हणाले, जेथे बाळ तेथे आई तेथे दुज्याचा पाड काई आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. बंकटलालांच्या ह्रद्य्याचा भक्तिभाव श्रीं जाणून होतें असे भक्त होणे दुर्मिळच. मग मी गजानन महाराजांचा किंवा महाराजांची फाॅलोअर म्हणण्यात कितपत तथ्य आहे. आपणच आपल्या मनाला विचारूयात. श्रींचे नामस्मरण करुयात. नानस्मरणातूनच उमगेल, आपल्याला आपल्या कृतीचे रहस्य.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com