संत हे राष्ट्र षुरूषच. त्यांनी राष्ट्राच्या उन्नतीकरीता अनेकांना सन्मार्गाला लावले. विचार परिवर्तन करून सत्याची जाणिव करून दिली. कोणाच्या हातून कोणते कार्य घडेल या संबंधीचेही संकेत दिले. भगवद्गीतेतील कर्मयोगावर जन्माला आलेले गीता रहस्य हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण होय. शेगांवच्या श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आणि कृपाप्रसादाने हा ग्रंथ निर्मिला तो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी. श्रींनी दिलेली स्फुर्ती शारदेच्या स्वरूपातून प्रगटली. ब्रह्मदेवाची कन्या शारदा हीच शब्दरुप होऊन टिळकांवर प्रसन्न झाली. अर्थात हे घडले कसे?. बारकाईने विचार करून पहा. श्रीं गजानन स्वामीं तर ह्या पाठीमागचे खरे सूत्रधार आहेत. टिळक मात्र निमित्तमात्र. टिळकांची श्रद्धा प्रबळ होती. कर्तबगार राष्ट्रभक्त ते. त्यांच्या मनीचा भाव ओळखला तो गजाननाने आणि टिळकांकरवी गीतारहस्य लिहून त्यांना मानसन्मान प्राप्त करून दिला. टिळकांना जगद्गुरुचा मान मिळाला. ह्या रहस्याचे जन्मदाते स्वामी गजानन होत. त्यांनीच म्हटलंय, करावयासी राष्ट्रोध्दार योग्य बाळ गंगाधर याच्या परी न होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com