शेगांवच्या श्री गजाननाच्या सेवेत रममाण व्हायचंय. असे अनेक जण म्हणताना कानावर येते. पण महाराजांकरीता एकत्र आले आणि स्वतःच्याच स्वभावाप्रमाणे वागू लागले तर. होतं असं अनेकदा महाराज महाराज म्हणायचं आणि आपल्याच म्हणण्याप्रमाणे वागायचे. मग काय होणार हो. संस्था टिकेल का? सामाजिक, सार्वजनिक क्षेत्रात ज्याचं काम त्याला करू द्यावं. ठरलेल्या कामात सार्यांनीच लक्ष घातले तर अनेकांची मने दुखवितात. हि समज येण्याकरिता सतत श्रींचे नामस्मरण असावे. पण सेवेचा अहंकार नसावा. श्रींचे निस्सिम भक्त बाळाभाऊ शेगांवात सातत्याने वास्तव्य करू लागले. हे भास्कर पाटील यांना सहन झाले नाही. सेवेचा अहंकार झालेले पाटील बाळाभाऊला वाट्टेल ते बोलत. ज्यांना विरक्ती आली त्यांनी येथे यावे.असे म्हणत. बघा श्रीं च्या शिष्यांमध्ये निर्माण झालेली अहममिका. गजानन महाराज एका बाजूला आणि भक्तांमध्येच अहंकारामुळे सुरु असलेला हा खेळ. परिणामी उत्पन्न झालेली वादाची स्थिती. परंतू स्वतः श्रीं मी बाळाभाऊला मार देण्याचा अभिनय करून भास्कराचा घालविलेला अहंकार. हे उदाहरण नेहमी वाचनात येते. पण त्यावरून बोध घेणारे आहेत का? असले तर फार थोडे. तात्पर्य काय संस्था असो मंदीर की उपासना केंद्र अध्यक्ष आणि पदाधिकारी एकमेकांवर व इतरांवर आपली मते लादणारे नसावेत. तर सर्वांना बरोबर कार्य सिद्धिस नेणारे असावेत. कामापुरता वापर करायचा आणि सोडून द्यायचं, पुन्हा नव्या सहकार्यांबरोबर तोच खेळ खेळायचा. हे योग्य नव्हे. असा दंभाचार काय कामाचा. त्यापेक्षा एकमेकांना सहकार्य करूयात आणि स्वतःसाठी नव्हे फक्त गजाननासाठी सत्कर्माची माळ हाती घेऊयात. कार्याची फुले माळेत गूंफता गूंफता मुखी नाम घेऊयात. जय गजानन श्री गजानन. गणी गण गणांत बोते. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com