अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊनी गेली. शेगांवचे गजानन स्वामींनी बाळकृष्ण बुवा रामदासी यांच्याकरीता म्हटलेला श्लोक होय. बुवा समर्थ रामदास स्वामींचे भक्त होते. संपूर्ण आयुष्य एकनिष्ठतेने त्यांनी राम नाम जपत रामदास स्वामींची भक्ती केली. उतार वयात सज्जनगड ची पायीवारी होइना. अखेर रामदास स्वामींनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला आणि गजानन रूपातून आपले दर्शन बाळकृष्ण बुवांना घडविले. बुवांच्या अंतःकरणाची अतिशय तीव्र आणि सात्विक होती. म्हणून तर गजानन स्वामी त्यांच्यासाठी धावून गेले. शरीरे जरी भिन्न तरीही आत्मा एकच. हे उदाहरण पटवून दिले. वचनाची पूर्तता केली. मीच रामदास मीच गजानन ह्याची कृतीतून प्रचिती आणून दिली. हेही सांगितले की, अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वर्हाडप्रांती संशय मुळी ना धरी चित्ती तो धरीता बुडशील. येथे विश्वासाला अनन्यसाधारण महत्व श्रींनी स्पष्ट केले आहे. रूपे भिन्न असली तरीही संताचा आत्मा एकच आहे. सत्कर्मासाठी ते अवतरले. आपणही त्यांच्या उपदेश आणि संदेशाचा बारकाईने विचार करायला हवाय. अन्यथा महाराजांनी म्हटलंय, मी तोच समजून करी गजाननाचे पूजन गीतेचे हे आहे वचन ‘संशयात्मा विनश्यती’.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com