मन असता पवित्र सदासर्वकाळ वाचावे गुरुचरित्र. श्री गजानन विजय ग्रंथही मनापासून वाचावा, असाच प्रासादिक वाणीचा ग्रंथ आहे. मन आणि शरीराची शुचिर्भूतता प्रसन्नता देते. मात्र केवळ कर्मकांड करणे मनाची स्वच्छता नसणे. हे योग्य नव्हे. शेगांवला श्री गजानन बाबांच्या दर्शनाला आलेला एक कर्मठ ब्राह्मण. शरीर शुचिर्भूततेला महत्व देणारा. श्रीं च्या मठाबाहेरील रस्त्यात एक कुत्रे मरून पडलेले पाहून तो खिन्न झाला. संतापला थेट श्रींचे साधूपण जळो येथपर्यंत बोलला. श्रींनीच त्याच्या बुद्धिपटलावरील भ्रम नाहीसा केला. योगसामर्थ्याने मृत कुत्रे जिवंत केले. तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरूत्तर म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी. मी व्यर्थ निंदा केली योग्यता ना जाणली ऐसे म्हणून घातली समर्थांच्या मिठी पाया. माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा वरदहस्त ठेवा शिरा मी अनंत अपराधी. तुच सोवळा साचार एक आहे भूमीवर करण्या जगाचा उद्धार तुम्हा धाडिले ईश्वराने. श्रोते त्याच दिवशी भली समाराधना त्याने केली कुशंका मनाची पार फिटली लीन झाला अत्यंत. समर्थ गजानन हा ईश्वरी अवतार आहे. मात्र तेथे दृढ श्रद्धा पाहिजे. आपणही आपली मने स्वच्छ ठेवण्याकरीता श्रींचे नामस्मरण करूयात. म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com