सध्याच्या जमान्यात अनेक स्वयंघोषित गुरू झालेले ऐकायला,पाहायला, वाचायला मिळते. त्यांच्यावर परीक्षा न विश्वास ठेवणारेही बहुसंख्य सापडतात. पण हिरा सुद्धा पारखून घेतात हो. शेगांवचे श्री गजानन महाराज असेच उच्चकोटीचे संत. त्यांचीही परीक्षा पाहीली. तेंव्हा कुठे त्यांना अनेकांनी गुरू केले आणि करत आहेत. त्यांच्यावर टिका करणार्यां भागाबाईने म्हटले होते, गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी भक्तिपंथाते दाविता. ही सर्व लक्षणे स्वामी गजाननाकडे होती आणि आजही आहेत. परंतू भागाबाई सारख्या अज्ञानी लोकांची काय कथा. पुंडलिक भोकरे यांचे मन भागीच्या सल्ल्याने विचलित होऊ नये म्हणून गजाननाने केलेला उपदेश आजही मार्मिक ठरतो. ते म्हणाले, कानांत काही बोलला म्हणून कां तो गुरु झाला लोक कानगोष्टीला किती तरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरू होती साचे नादी दंभाचाराचे त्वां पुंडलिका पडू नये. एवढेच तूला वाटत असेल तर तू इकडे करी कान मंत्र देतो तुजकारण गण गण ऐसे बोलून महाराज स्तब्ध जहाले. श्रीं नी त्यांचे परम भक्त भोकरे यांना वाम मार्गावर जाऊ दिले नाही. आपणही कोण्या भोंदूबाबावर विश्वास ठेवता कामा नये. त्यासाठी हवी पारख नजर. ती येईल श्रींच्या नामस्मरणाने. म्हणून तर सातत्याने म्हणूयात, श्री गजानन जय गजानन , गणी गण गणांत बोते. श्रीराम जयराम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com
Jay Gajanan