नर्मदा परिक्रमा करणारे अनेक आहेत. ही चांगली गोष्ट. शक्य त्यांनी जरूर करावी. शेगांवच्या श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला प्रत्यक्ष नर्मदा आली होती. भक्तांच्या आग्रहास्तव महाराज तेथे गेले होते. पण नौकेला छिद्र पडल्याने पाणी आत शिरत होते. परी महाराज निर्धास्त होते.’ गिन गिन गणांत बोते’ ऐसे भजन मुखाने चालले होते अखंड. घाबरलेल्या भक्तांना त्यांनी धीर दिला. त्यांनी नर्मदेची प्रार्थना केली, नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी मंतु क्षमा करी यांचा दयाळू होऊनी मनी. नौकेतले पाणी निघून गेले. नर्मदा श्रीं ओंकार कोळ्याचे रूप घेऊन श्रीं स्वामी गजाननाच्या दर्शनाला आली. श्री गजानन विजय ग्रंथात ही कथा आहे. तात्पर्य काय की, संकटकाळी ही गजानन स्वामी रक्षण करतात. मात्र हेतू शुद्ध असावा. श्रींचे ते खरे निस्सिम भक्त होते. अती आग्रहाचा परीणाम काय होतो. याची जाणीव त्यांना झाली. मुखाने करू लागले जयघोष गजानन बाबांचा. आपली निर्मळ श्रद्धा असेल,तर बाबांचा धावा करता ते आपल्या मदतीला धाऊन येतील. अढळ श्रद्धा आपलीही बसेल. मात्र त्यासाठी आपण एकच करू शकतो, ते म्हणजे श्रींचे नामस्मरण. बोलूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जयराम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com