प्रत्येकाच्या भक्तीची, उपासनेची तर्हा निराळी असल्याचे नेहमी पाहायला मिळते. श्री गजानन स्वामींची आराधना हाच त्यामागचा उद्देश असतो. कोणी पायी वारी करतात. तर कोणी पारायणे, कोणी नामस्मरण करतात. मात्र या अवस्थेतही शेगांवाचे स्वामी गजानन आपल्या मदतीला धावून येतात. संकटकाळी रक्षण करतात. श्रींचे परम भक्त पुंडलिक भोकरे यांनी मुंडगांव ते शेगांव पायी वारी केली. मात्र त्यांना वारीतच शारिरीक व्याधी जडली. ते कसेबसे शेगांवला आले. तेंव्हा महाराजांनी पुंडलिकबुवांच्या व्याधीचं निवारण करून त्यांचे गंडांतर घालविले. वास्तविक श्रद्धा आणि निस्सिम भक्ति असली की देवही धावून येतो. आपल्यालाही या कथेतून श्रद्धेचा बोध घेता यायला हवा. जसी आपली श्रद्धा दृढ होईल. तसंतसे आपल्यालाही आत्मिक आनंद मिळेल. प्रत्येकाचा सेवा भक्तीचा जरी वेगळा असला तरी अंतिम ध्येय एक ते म्हणजे स्वत्वाची ओळख. प्रत्येक व्यक्तीत स्वत्व म्हणजे परमेश्वराचे अधिष्ठान असते म्हणून म्हटले आहे. त्या स्वत्वाकडे जाण्याचा एक मार्ग भक्ती होय. आपण सामान्य पामर माणसं. आपण नाम तरी घेऊ शकतो. म्हणून म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जयराम जय जय राम, जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com