चौर्यांशी कोटी योनीनंतर मनूष्य जन्म मिळतो. असे म्हणतात. आपल्या संचितावरून प्रारब्ध ठरते. प्रारब्धानूसार क्रियमाण ठरते. मात्र शेगांवचे श्री गजानन महाराज म्हणतात, जन्म मरण हिच मूळी भ्रांती आहे. आत्मा अमर आहे.आपण उगाचच शरीररूपी वस्त्राला किंमत देतो. आत्म्याला अंतरात्म्याची ओढ लागली तर ह्या सार्या मायाजालाची अनुभूती येऊ शकेल. अर्थात त्याकरता हवे ते नामस्मरणाचे सातत्य. जन्मे न कोणी मरे न कोणी हे जाणावयालागूनी परमार्थाचा उपाय जाणी शास्रकारे कथन केला. त्याचा उपयोग करावा मोह समूळ सोडावा प्रारब्धभोग भोगावा निमूटपणे हेच बरे. संचित प्रारब्ध क्रियमाण हे भोगल्यावाचून या बध्द जीवालागून सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे जन्मा हा सिध्दान्त असे. या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे असे किती सांग घ्यावे फेरे जन्ममृत्यूचे. ? श्री गजाननाचा हा उपदेश आपण अमलात आणण्याचा प्रयत्न तर करूयात. जे प्रारब्धात आपल्या आहे ते घडेल पण त्यातूनही आधार मिळेल. श्री स्वामी गजाननाच्या नामाचा. म्हणूनतर म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जयराम जय जय राम, जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com