मनूष्याने शरीररुपी वस्र परीधान केलंय. या वस्रावर आपले सार्यांचेच मनापासून प्रेम असते. परंतू सत्पुरूषांचे तसे नाही. त्यांचे असित्व अगदी अणू रेणूतही. आपल्यासारख्या भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या पामरांना हे ते काय समजणार. शेगांवीच्या गजानन स्वामींनी हेच म्हटलंय, मनुष्य योनीत जन्म झालेल्यांनी तरी आपल्या जन्माचे प्रयोजन ओळखायला हवे. सृष्टीतील प्रत्येक जीवमात्राचे अस्तित्व जाणून घ्यायला हवे. तरच आपण कोण, आपले कार्य काय. आपल्याला काय करायला हवंय व काय नको. याचा अर्थ बोध होण्यास सुरुवात होईल. अर्थात ही उच्चकोटीची अवस्था आहे. लिहून, सांगुन अशी अवस्था प्रत्यक्षात अनुभवास येणे नव्हे. त्यास पाहिजे नामस्मरणाची जोड. जेवढे नामस्मरण गजाननाचे कराल. तशी तशी प्रश्नांची उकल होऊ लागते. हे देखील स्व अनुभवावरच आहे. कारण नामातही सात्विकता असावी. तरच श्रींचे शब्द सतत कानी पडतील. ते म्हणजे, चराचरात मीच आहे. ही सृष्टी माझेच रुप आहे. महाराजांचा हा उपदेश अत्यंत मार्मिक आहे. श्रींनीच म्हटलंय, माशी तरी मीच झालो मोहोळ तेही मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे तेही रुपे माझी.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com