श्री गजानन महाराज प्रगटदिन
संस्थेचा अत्यंत महत्वाचा उत्सव माघ वध्य सप्तमी रोजी श्रीच्या कृपेने साजरा होतो. सन १९९६ पासून अज्तागत नाशिक महानगर क्षेत्रात सर्वात मोठा प्रमाणात प्रगत दिन साजरा केला जातो. सुरवातीला सर्वात अल्प प्रमाणांत श्रींचा प्रगतदिन हा गोपाल मानागल कार्यालय, सरदार चौक, पंचवटी येथे शिरा, मसालेभात व साखर फुटणे अशा स्वरुपात प्रसादाचे वाटप केले होते.
आता हा प्रगटदिन २४ फेब्रुवारी २०११ पारून देवमामलेदार श्री यशवंत महाराज संस्थान- नाशिक यांच्या विशेष सहकार्याने श्री.यशवंत महाराज पटांगण, गंगाघाट, पंचवटी, नाशिक येथे संपन्न होतो.
सकाळी श्रीचे पूजन होऊन श्रीची पालखी महानगरातून सावद्या पथके, भजनी मंडळ, रथ, शोभावंत बग्गी, चित्ररथ असा भव्य पालखी सोहळा संपन्न होतो. या उत्सवात ९०१ किलो बाजरी+ज्वारी भाकरी ,१२५ किलो पिठलं, ४५० किलो शिरा, २१०० पानाचा तांबुल, अन्नकोट महाप्रसाद म्हणून वाटप केला जातो. यावेळी श्रीच्या दर्शनासाठी व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी शहरातील सुमारे ११ ते १२ हजार भक्तांना मिळतो
प्रगटदिन छायाचित्रे
प्रगटदिन मिरवणूक छायाचित्रे