श्रींची आरती

 

जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया
।। जयदेव जयदेव ।।धृ।।
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी
स्थिरचर व्यापून उरलें जे या जगताशी
तें तूं तत्त्व खरोखर निःसंशय अससी
लीलामात्रें धरिलें मानवदेहासी
।। जयदेव जयदेव ।।१।।
होऊं देशी त्याची जाणिव तूं कवणा
करूनीगणि गण गणांत बोतेया भजना
धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना
जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना
।। जयदेव जयदेव ।।२।।
लीला अनंत केल्या बंकट सदनास
पेटविलें त्या अग्नीवांचूनी चिलमेस
क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश
।। जयदेव जयदेव ।।३।।
व्याधी वारून केलें कैकां संपन्न
करविले भक्तालागी विठ्ठलदर्शन
भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन
।। जयदेव जयदेव ।।४।