संस्थे बद्दल माहिती

स्थापना

दरवर्षी श्री गजानन महाराज संस्थान शेगांव येथून श्रींची पालखी नाशिक येथे येत असत या श्रींच्या पालखीचा मुक्काम नाशिक शहरात राठी ताई बंगला, अशोक स्तंभ, नाशिक येथे राहत असत. माहे जानेवारी १९९६ मध्ये राठी बंगला नाशिक ये ठिकाणी श्रींच्या पालखीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आदरणीय श्रीमती सुमतीताई बापट, आदरणीय आनासाहेब बेळे यांच्या उपस्थितीत श्री गजानन महाराज भक्त मंडळ या नावाने मंडळाची स्थापना होऊन पहिला प्रकट दिन ११ फेब्रुवारी १९९६ श्री गोपाल मंगल कार्यालय सरदार चौक पंचवटी नासिक-३ येथे संपन्न झाला. या नंतर विविध कार्यक्रमाना सुरुवात झाली यावेळी श्री रमेश बापट, श्री रवीशेठ पोतदार, श्री सुरेश देवरे, श्री प्रकाश पगारे, आदी विद्यमान सभासदांसह अनेक सभासद उपस्थित होते. या नंतर विविध उपक्रम सतत चार वर्षे आयोजीत करण्यात आले त्यात श्रीं चा प्रकट दिन महत्वाचा व उत्साहात साजरा केला जातो.

संस्था हि नोंदणीकृत करण्यासाठी सन २००० मध्ये मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नाशिक यांच्याकडे विनंती अर्ज करण्यात आला श्रीं च्या कृपेने १ नोव्हेंबर २००० मध्ये श्री गजानन महाराज सेवा संस्था नाशिक या नावाने नाशिक शहरात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने श्री रामदास बोन्दार्डे यांच्या निवासस्थानी सभा होऊन स्थापना झाली. तसेच मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नाशिक यांच्याकडे विनंती अर्ज केल्याप्रमाणे नोंदणी क्रमांक महाराष्ट्र / ६७७०/२०००/नाशिक व एफ / ६७५ नाशिक दिनांक ३१-०३-२००१ ने कायम स्वरूपी नोंदणी क्रमांक संस्थेस प्राप्त झाला.

श्री गजानन महाराज (शेगाव) हे प्रथमतः सद्गुरु व श्री गजानन महाराज संस्थान- शेगाव अधिष्ठान मानून सन २००० पासून संस्था नाशिक महानगर क्षेत्रातील नागरिक व भात्क्तांच्या विश्वासास पत्र ठरेल आहे.

संस्थेचे सभासद-

१८ वर्षावरील किव्वा वर्षाचे कोणतेही भारतीय व्यक्तीला संस्थेचे कार्यकारणीने मंजुरी दिल्या नंतर निर्धारित सभासदत्व प्राप्त होईल. आतापर्यंत संस्थचे ४० आजीव सभासद आहेत. या संस्थच्या सभासदांमध्ये नाशिक शहरातील ३ मान्यवरांना मानद सभासद करून घेण्यात आले आहे.

संस्थच्या कार्याला सतत हातभार लावणाऱ्या सन्माननीय व्यक्ती सर्व साधारण सभासद (वार्षिक सभासद) आहेत. यात विशेष बाब म्हणजे सर्व पदअधिकारी हे सर्व प्रथम श्री गजानन महाराजांचे भक्त असून ते व्यवसाय, नोकरी करून संस्थच्या कार्यात मदत करण्या साठी सभासद झाले आहे.

 

संस्थचे कार्यकारी मंडळ-

संस्थेच्या कार्यकारी मंडळात कमीतकमी ७ व जास्तीतजास्त ११ पदअधिकारी असू शकतील. त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव, खजिनदार व अन्य कार्यकारी मंडळ सदस्य आहेत. सर्व साधारण इतर संस्थेत जसे कार्य चालते त्याचप्रमाणे नाशिक उत्सव पूर्व/उत्तर वार्षिक सभा घेणे. ठराव योग्य निर्णय घेतले जाते.

उपरोक्त प्रमाणे पदाधिकारी सदस्य निवडलेले असले तरी सर्व प्रथम ते श्रीचे सेवक आहे, व त्यांनी सेवेकरी म्हणून काम करावे असा सर्वानुमते प्रथम ठराव संमत करण्यात आला आहे व त्याप्रमाणे कामे केली जात आहे.

संस्थेचे हिशोब व ऑडीट

संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम, उत्सव, पारायण आदी मार्फत संस्थेकडे आर्थिक, वस्तू स्वरुपात (प्रसादासाठी आवश्यक असणाऱ्या) जमा होतात. आपल्या संस्थेचे प्रत्येक होशोब वेळोवेळी पूर्ण केले जातात. त्यांचे सनदी रोखपाल (सीए) ओस्तवाल आणि पगार कंपनी, नाशिक ह्याचेकडून हिशोब तपासणी करून अहवाल तयार करण्यात येतो.