संस्थेतर्फे आयोजित होणारे उत्सव
श्री गजानन महाराज प्रगटदिन
संस्थेचा अत्यंत महत्वाचा उत्सव माघ वध्य सप्तमी रोजी श्रीच्या कृपेने साजरा होतो. सन १९९६ पासून अज्तागत नाशिक महानगर क्षेत्रात सर्वात मोठा प्रमाणात प्रगत दिन साजरा केला जातो. सुरवातीला सर्वात अल्प प्रमाणांत श्रींचा प्रगतदिन हा गोपाल मानागल कार्यालय, सरदार चौक, पंचवटी येथे शिरा, मसालेभात व साखर फुटणे अशा स्वरुपात प्रसादाचे वाटप केले होते.
आता हा प्रगटदिन २४ फेब्रुवारी २०११ पारून देवमामलेदार श्री यशवंत महाराज संस्थान- नाशिक यांच्या विशेष सहकार्याने श्री.यशवंत महाराज पटांगण, गंगाघाट, पंचवटी, नाशिक येथे संपन्न होतो.
सकाळी श्रीचे पूजन होऊन श्रीची पालखी महानगरातून सावद्या पथके, भजनी मंडळ, रथ, शोभावंत बग्गी, चित्ररथ असा भव्य पालखी सोहळा संपन्न होतो. या उत्सवात ९०१ किलो बाजरी+ज्वारी भाकरी ,१२५ किलो पिठलं, ४५० किलो शिरा, २१०० पानाचा तांबुल, अन्नकोट महाप्रसाद म्हणून वाटप केला जातो. यावेळी श्रीच्या दर्शनासाठी व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी शहरातील सुमारे ११ ते १२ हजार भक्तांना मिळतो
श्री गजानन महाराज पुण्यतिथी (ऋषी पंचमी) उत्सव –
सन २००१-२००२ पासून सुरु केलेला घरगुती स्वरुपात श्रीचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला जात असे. आता तो मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो. यावेळी श्रीच्या रजत मुखवट्यास लघुरुद्र अभिषेक,पूजा, भजन, कीर्तन, महाप्रसादाचे वाटप केले जाते.
श्री गुरुपोर्णिमा उत्सव-
गुरुवर्य महर्षी व्यास ह्याचे पूजन म्हणजे गुरु पोर्णिमा होय. या दिवशी श्रीच्या रजत मुखवट्यास लघुरुद्र अभिषेक,पूजा, महाप्रसादाचे वाटप केले जाते. तसेच यावेळी रक्तदान शिबीर (अर्पण रक्तपेढी), मोफत नेत्र तपासणी करून चष्म्याचे वाटप (डॉ. सौ वर्हाडे-नेत्ररोग तज्ञ ह्यांचा सहाय्याने) शारीरिक आरोग्य तपासणी शिबीर (डॉ श्री व सौ चिट्टीवाड ह्यांचा सहाय्याने) आदी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. नाशिक महानगरमधील गरजू व होतकरू विधार्थ्याला शिक्षणासाठी रोख स्वरुपात मदत करते.
श्री गजानना महाराजांचा विजय ग्रंथ पारायण सोहळा-
सन २००१ पासून म्हणजे संस्थची नोंदणी झाल्यापासून श्री गजानना महाराजांचा विजय ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यार येतो. या पारायण सोहळयाचे विशेष म्हणजे श्रीगजानन विजय मुखोतगत असलेल्या श्रीमती सुमतीताई बापट यांचे सदरातील पारायणास उत्तम सहकार्य लाभून २००१ पासूनचे पारायण सोहळे यशस्वी झालेले आहे हि विशेषबाब आहे.
संस्थेच्या वतीने वर्ष्तून किमान २ नववर्षाच्या सुरवातीचा पहिल्या आठवड्यात म्हणजे जानेवारी महिना व पवित्र श्रावणमासा मध्ये पारायण आयोजित केले जाते. या शिवाय अधिक मासातही प्रती ३ वर्षांनी पारायणाचे आयोजन केले जाते. या पारायणासाठी नाशिक शहरातून असंख्य महिला व पुरुष भाविक भक्तांचा समावेश होतो.
अधिक मासानिम्मिता शाहीस्नान व श्रीराम भेट-
आपल्या संस्थेचा वतीने श्री गजानन महाराजानाचा रजत मुखवटा सन २००५ मध्ये तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर आलेलेल अधिक मासामध्ये श्रीची सही मिरउणूक नगरमधून काढण्यात येउन ती रामकुंडावर शाहीस्नान व जलाभिषेक कार्यात येतो. त्यानंतर श्री रामांच्या मंदिरात भेट झाल्यानंतर मुखवटा दर्शनासाठी दिवसभर मंदिरा जवळील परिसरात ठेवला जातो. अश्या प्रकारे आत्तापर्यंत तीन वेळा शाहीस्नान झाले आहे आणि नाशिक मधील कुंभमेळा २०१५ मध्ये ही महाराजाचे शाहीस्नान करण्यात आले होते.
श्रीच्या अनिभाव कथनाचा कार्यक्रम-
महाराजाच्या असंख्या भक्तांना आजमितीस मोठ्या प्रमाणावर अनुभव येत असतात. सदर भांनी आपल्या बोली भाषेत टायचे अनुभव सांगण्याचा कार्यक्रम आदरणीय श्रीमती सुमतीताई बापट ह्याचा मार्गदर्शनाखाली सन २००८ मध्ये साजरा करण्यात होता. ह्या उपक्रमात मुंबई -दादर -डोंबिवली – कल्याण – पुणे – कोल्हापूर -सोलापूर -अहमदनगर -येवला- नाशिक शहरातील अनेक भक्त सहभागी झाले होते. असा उपक्रम नाशिक शहरात प्रथमतः आयोजित करण्यात आला होता.
श्रीची वासंतपूजन (वसंतउत्सव)-
आपल्या संस्थच्या वतीने सन २००९ व २००१० मध्ये श्री गजानन विजय ग्रंथातील सांगितल्याप्रमाणे श्रीवासंतपुजेचा कार्यक्रम हजारो भाक्त्यांच्या उपस्थितात संपन्न झाला. या कार्यक्रमात नाशिक शहरातील विद्वान ब्राम्हरुंदना निमंत्रित करून त्यांचे स्वागत करून पूजन करण्यात येते. हा उपक्रम आदरणीय श्रीमती सुमतीताई बापट ह्याचा मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने सुरु करण्यात येउन उत्साहात साजरा केला जातो.