शेगांवीचे गजानन बाबांची लिलाच न्यारी. तो एक हिरा होय. त्या हिर्याचे तेज आजही झळकत आहे. दासगणू महाराज गजाननाची स्तृती करताना म्हणतात. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेज त्याचे पाहोन ज्ञाते तल्लिन होती की. तेथे त्या हिर्याची खाण आहे कोणची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. गजानन स्वरुपी कमळाचा सुगंध हुंगण्यात खरा आनंद आहें. बाबांवर निर्मळ प्रेम करा. मग बघा तुमच्या अडचणी दूर होतात किनी त्या. सन्मार्ग दाखविणारा सत्पुरुष तो. आनंदाची खाण जणू. स्वतःच्या म्हणजेच निज आनंदात मग्न. मौनातही उपदेश करणारा उपदेशक. खरा ज्ञान तपस्वी.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com