परिचय गजाननाचा – भाग १३

संताच्या सहवासात अनेक लोक येतात. हौसे,गौसे,नौसे,स्वार्थसाधू,प्रापंचिक हरतर्हेची माणसे ती. परंतू साधूत्वाची चाड म्हणजे जाणिव असणारे फारच थोडे. आपमतलबी माणसे तर फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतात. आजही आपल्या अवतीभवती अशी माणसं पाहायला मिळतात. स्रि असो की पुरूष, मुलगा असो की मुलगी स्वतःच्या स्वार्था पलिकडे समोरच्याचे नुकसान होत आहे असे त्यांना जराही वाटत नाही. कृतघ्न वृत्ती प्रवृत्तीचीच माणसे ती. शेगांवच्या अवलिया गजाननाने अशांना म्हटलंय, स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधूत्वाची चाड नसे. ऐसे न कोणी करावे तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. खर्या संतांचा आदर राखणे आपले कर्तव्य आहे. पण सामान्य माणसाचा, ज्यांनी आपल्याला सतत मदत केली. सदैव आपल्या भल्याचा विचार केला. त्यांना झिडकारायचे. किंमतही द्यायची नाही. त्यांच्याकडे साधं ढुंकुंनही पाहायचं नाही. या वागणूकीला काय म्हणायचे. एकप्रकारे सत्प्रवृत्तीची अवहेलना, अपमान करणे होय. अशा लबाडांना त्यांच्या कर्माची फळे मिळतातच. असो. आपण किमान सज्जनांची संगत धरू. त्याव्दारे आपल्याही आयुष्यात आनंद येत राहील. मुखी गजाननाचा नाम घेऊ. आणि म्हणू, प्रपंच अवघा अशाश्वत त्यात कशाला गोवू चित्त केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असो आजपासुन मी न सोडी तूमचे चरण अमृताला टाकुन विष प्याया कोणी जावे. अर्थात सज्जनांनाच जवळ करू. स्वार्थसाध्यांना दूर सारू.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.