नटणं,मुरडणं हा माणसाचा स्वभाव. त्यात वावगं असं काहीच नाही. पण बाह्य सोपस्कारापेक्षा अंतर्यामीचे सोपस्कारही आवश्यक आहेतकी. ते रूजायला पाहीजे नामस्मरणाची साथ. पुन्हा पुन्हा नामस्मरणाचाच उल्लेख येतो आणि येत राहील. नामस्मरण चिरकाल टिकणारं आहे. त्यातुनच आत्म्याची, सत्य असत्याची जाणिव निर्माण होते. अर्थात जे नामस्मरण करतात. त्यांस हे सांगणे न लगे. जे करित नाहीत बाह्य सोपस्काराला अवाजवी महत्व देतात.त्याच्यासाठी हा अल्पसा प्रयत्न होय. शेगांवच्या गजानन बाबांनी सद्भक्त बाळकृष्ण बुवांना रामदासस्वामींच्या रुपात दर्शन दिले. ते म्हणाले, शरीररूपी वस्रास तु किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे ? श्र्लोक आहे गीतेठायी वासांसि जीर्णानि तो पाही ऐसा मुळीं न भ्रमिष्ट होई चाल पाटी बसवी मला. अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वर्हाडप्रांती संशय मुळी ना धरी तो धरिता बुडशील. मी तोच समजून करी गजाननाचे गीतेचे हे आहे वचन संशयात्मा विनश्यती. श्रींनी मार्मिक शब्दांत वास्तव व शाश्वत स्थितीचे वर्णन केले. ही अनुभूती घ्यायची असेल तर आपणही म्हणूयात, जय जय रघूवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com