श्रीराम म्हणा की गजानन म्हणा, सततच्या नामस्मरणाने वाणीची शुद्धता प्राप्त होते. परंतू उच्चारांचा पूर्वाभ्यास केला नाहीतर मूखातून चूकीचे,अर्थहीन,अस्पष्ट शब्द प्रसूत होतात. शेगांवच्या गजानन महाराजांना हे कधीच मान्य नव्हते. स्वतःच्या कृतीतुन त्यांनी हे दाखवून दिले असल्याची श्री गजानन विजय ग्रंथात उदाहरणे सापडतात. भागवतातल्या कथेतील उत्तरार्ध असो की वेदांचा उच्चार असो. ते अस्सखलित भाषेत, स्पष्ट शब्दोच्चारात म्हणत असत. त्यांचीही प्रखर बुद्धिमत्ता,दैवी तेज आणि साधना पाहून त्यावेळच्या तैलंगी ब्राह्मणांनी म्हटलंय, परमहंस दिक्षा याची वार्ता न उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी. श्रींनी कृतीतून पटवून दिले. पण त्या तैलंगी ब्राह्मणांना उपदेश केला, हि न विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची बा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मनी आणा उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका . जी ॠचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरु केली जाणी तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यांत शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. अलौलिक प्रतिभेचा हा संत. त्यांनी सांगितल्या प्रमाणे आपण शब्दांचे उच्चार स्पष्ट करुयात. त्यातुन उमगेल तो शब्दांचा अर्थ. तर मग म्हणूयात, श्रीराम जय राम जय जय राम, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते. गजानन बाबा की जय.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com