शेगांवीचे गजानन महाराज उच्चकोटीचे संत. ज्ञानयोगी. त्याच्या विषयी माहिती घेऊ इच्छीणार्या जिज्ञासूंना सतत नविन नविन माहिती मिळत राहते. असा अभ्यासकांचा अनुभव सांगतो. जिकडे पहावे तिकडे भास होवो लागला त्यांचा खास याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा. पोर जसे आईला शोधत राहाते अगदी तसाच अनुभव अभ्यासकांना व श्रद्धावानांना येत असतो. मात्र तेथे खरी श्रद्धा असावी. मग त्या अयोनीजन्म्याचे तेज सर्वार्थाने झळकतेच. असा कित्येकांचा अनुभव आहे. श्रींचाच विचार सतत बुद्धिपटलावर रूंजी घालत राहतो. म्हणून तर आजच्या घडीला महाराज निर्गूण अवस्थेत असले तरीही प्रथम त्यांच्या समाधि दर्शनासाठी सार्यांची पावले शेगांवच्या दिशेने वळतात. श्रीं चा महिमा अनंत सागरासारखा आजही वाहतोय. त्या तिर्थरूपी महिमेचे तुषार आपल्यावर पडावेत म्हणून श्रीं चा धावा करतात. अखंड नामस्मरण, पोथी, स्तोत्र वाचन करतात. शेगांवीच्या वार्या करतात. समाधि स्थळाला साष्टांग दंडवत, प्रदक्षिणा घालतात. श्रीं च्या ध्यासापोटी नानातर्हचे छंद जोपासतात. कारण एकच फक्त गजानन आणि गजानन हेच होय. तेंव्हा प्रचिती येते ती, गोड न लागे अन्नपाणी समर्थांचा ध्यास मनीं न हाले दृष्टीपासोनी गजाननाचे रुप ते.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com.