राजाचे जेथे वास्तव्य तिच त्याची राजधानी. शेगांवीचे बाबा गजानन जेथे जात तेथे भक्तिचा मळा फुललेला असे. म्हणून तर म्हटलंय, समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला राजा जाय जया स्थला तिच होते राजधानी. महाराज आकोलीला भास्कर पाटलाच्या शेतात गेले. तेथल्या कोरड्या विहिराला त्यांनी पाणी आणलं. कृष्णाजी पाटील यांच्या मळ्यात गेल्यावर त्यांनी ब्रह्मगिरी गोसावी यांना मनूष्य जन्माचे मर्म सांगितले.अशी अनेक उदाहरणे श्री गजानन विजय ग्रंथात आहेत. आजमितीला श्रींचे लिलाकार्य जगभर पसरलेले आहे. जणूकाही अवघे विश्व गजाननाची राजधानी आहे. कोण सत्कर्मी कोण दुष्कर्मी हे सारे त्यांना ज्ञात आहे. कारण श्रीं नी म्हटलंय, मी गेलो ऐसे मानू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेच. शेगांवस्थित गजानन राजाची सर्वत्र नजर आणि संचार निर्गुण अवस्थेत आजही आहे.अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे चांगल्या वाईट प्रवृत्तीकडे त्यांची नजर असणारच. तेथे लबाडाचा हेतू कधीच सफल होणार नाही. सगूण स्थितीत त्यांनी लक्ष्मण घुडे याला त्याची जागा दाखवून दिली. त्याच्या आग्रहास्तव ते त्याच्या घरी गेले. तेंव्हा तो खजिन्याच्या उंबर्यावर बसून राहीला. विरक्त वृत्तीचे महाराजांनी हे ओळखलं. ते म्हणाले, माझे माझे म्हणसी भले भोग आता त्याची फळें माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया आलो होतो या ठाया याहीपेक्षा दुप्पट द्याया परी ते न तुझ्या प्रारब्धी. श्रींनी वास्तवाचे त्याला भान आणून दिले. अवघ्या सहा महीन्यात तो कफ्लक झाला. सांगायचे तात्पर्य काय आपणही श्रद्धेने भाविकांची मने न दुखविता वागले पाहिजे. श्रीं च्या सेवेचं मंडळ स्थापन केलं. येणार्या भाविकांचा कामापुरता, सोईनुसार वापर करणे. स्वतःची मते इतरांवर लादणे. मी अध्यक्ष मी विश्वस्त मी पदाधिकारी माझंच इतरांनी एकायचं. एकाकडून स्वार्थ साधला की दुसर्याला जवळ करायचे तेही स्वार्थासाठीच. स्वार्थ पुर्ण झाला की बाजूला सारायचे. हा सेवेचा अहंकारच म्हणायचा. मग कसा काय हो सेवेकरी तो तर मेवेकरी. प्रसिद्धीला हापापलेला. अशा ठगांची कृत्यांपासुन सावध राहूयात आणि सत्शिल वृत्तिचे समर्थन करूयात. तरच गजानन राजाच्या ह्या राजधानीत आनंदाचे तरंग उमटू लागतील.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com