संतांची सेवा करावी. पण फळाची अपेक्षा धरू नये. ते आपोआप मिळतेच. शेगांवच्या गजानन स्वामींचे परम शिष्य भास्कर पाटील हे त्याचे उत्तम उदाहरण होय. याच पाटलांच्या शेतातील कोरड्या विहिरीला गजाननांनी पाणी आणलं. भास्कराच्या अंतःकरणात भक्तीचा मळा फुलविला. श्रींच्या सेवेत रममाण झालेल्या भास्कराचा अंतही श्रींच्या समोर झाला. पण त्यांना वैकुंठ प्राप्ती झाली. तत्पुर्वी श्रींचे आणखीन एक परम शिष्य पाटलांना म्हणाले होते, भास्करा तू धन्य धन्य संतसेवा केलीस पूर्ण चुकले तुझे जन्ममरण काय योग्यता वानू तुझी. श्रींच्या सेवेचे फळ पाटलांना मिळालं. ते मोक्षाप्रती पोहोचले. अर्थात त्यांची श्रींच्या प्रती निस्सिम श्रद्धा होती म्हणून भक्तीचा भाव जन्मला. त्यांचे अंतःकरण स्वच्छ त्यांना सकारात्मक विचारांबरोबर सत्संगही लाभतोच. श्रीं च्या सेवेचा ध्यास घेतलेल्यांना सतत श्रींच्याच दर्शनाची ओढ लागलेली असते. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र स्वामीं गजाननाचेच अस्तित्व असावेसे वाटते. प्रवासात असतानाही अचानन समोर श्रींचे छायाचित्र अथवा मूर्ती डोळ्यासमोर आली तर मनात सहजच विचार येतो, जेथे जाईल तेथे तू माझा सांगाती.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com