गुरूराया कृपाराशी नका उपेक्षूं लेकरासी ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. भाऊ कवंर यांनी आर्ततेने मारलेली ही हाक. त्यांच्या हाकेतली पोटतिडीक शेगांवच्या गजाननाने अंर्तमनाने ओळखली. कवरांच्या शिदोरीसाठी महाराज चार तास तसेच उपाशी बसून राहिले. भक्ताच्या भक्तीचा हा खरा विजय. पण भक्तही अनेक परीक्षा उत्तीर्ण असावा लागतो. कवर अगदी एकनिष्ठ होते. ते जेंव्हा शेगांवात पोहोचले. तेंव्हा, त्या भाऊस पाहून समर्थै केले हास्यवदन बरेच दिलेस आमंत्रण ही कां वेळ जेवणाची? तूझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहीलो नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी. श्रींनी कवरांच्या भाजी भाकरीचा स्विकार केला आणि तु डाॅक्टरी परीक्षेत पास होशील, असा आशीर्वादही दिला. तेंव्हा कवरही म्हणाले, आपुले हे दिव्यचरण हेच माझे धनमान सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. कवर हेही काही मागायला गेले नव्हते. ईश्वर आणि सात्विक भक्तीभावाची ती भेट होती. आपण सामान्य माणसे. संचित, प्रारब्धा प्रमाणे वागतो. श्रीं नी आपल्याला आपल्या मनासारखे सारेकाही द्यावे, हीच खरी आपली अपेक्षा. या स्वार्थानेच आपण श्रींचे नाव घेतो. काही फायद्याचे मिळते का? ते पाहातो. वरकरणी आपली श्रद्धा. मग फळही मिळणार ते वरवरचेच. अपार श्रद्धा असे उदाहरण दुर्मिळ असो. आपण आपला प्रामाणिक भाव सतत जागृत ठेवायचा किमान प्रयत्न तर करूयात. श्रींचे नाम घेऊयात. म्हणूयात. श्री गजानन जय गजानन. गणी गण गणांत बोते. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com