शेगांवचे गजानन महाराज. नरदेहधारी परमेश्वर तो. भक्तांच्या आर्त हाकेला धाऊन जाणारे संत. सद्भक्त भास्कर पाटील यांना कुत्रे चावले. त्या कुत्र्याचे विष अंगी भिनू नये. म्हणून कृपा केली. नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर कूत्र्यांच्या विषापासून वाचण्यासाठी उपयुक्त वनस्पती आहे. हेही सांगितले. श्रींच्यामुळे तेथे अशी आयुर्वेदिक वनस्पती आहे. हे समजले. आजही ती वनस्पती तेथे असेल. संशोधक शोध घेतीलही. आपण असा विचार करूयात योग,भक्ती,वेदशास्रसंपन्न, विविध भाषा बोलणारे गजानन स्वामी विद्वावांना हरवतील. एवढे त्यांचे अघाध सामर्थ्य होते व आजही आहे. औषधोपचाराची देखील त्यांना माहीती होती. जानराव देशमुखांना केवळ चरणतीर्थांनी त्यांनी बरे केले. लक्ष्मण घूडे याला आंबा खाऊ घालून त्याच्या पोटाची व्याधी नष्ट केली. गणू जव्हारीला मृत्यूपासून अभय दिले. अंगार्याने डाॅ. भाऊ कवंर यांच्या शरीरावरचा फोड घालविला. पुंडलिक भोकरे यांचेही गंडांतर टाळले. वैद्याचीही भूमिका बजावली. तेही फक्त लोककल्याणासाठी. अनंत उपकार करणारे महाराज. त्यांचे शेगांवस्थित संस्थानही रूग्णांची जीवभावे ईश्वरसेवा करते. रूग्णांना मोफत औषधोपचार करते. आजही श्रींची ही सेवा आपल्या सारख्या सामान्य जिवांकरीता अव्याहतपणे सुरू आहे. तेंव्हा असेच म्हणावेसे वाटते, हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेकरासी कृपा करा अर्भक मी तुमचे असे.
जय गजानन श्री गजानन. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com