अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये.प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया. शेगांवीच्या श्री गजानन स्वामींनी बंडूतात्या दंडे यांना केलेला हा उपदेश. बंडूतात्या सात्विक,सदाचारी वृत्तीचे ब्राह्मण होते. दानधर्म, पूजाअर्चा करण्यात त्यांना आनंद. मात्र प्रपंच करून परमार्थ साधायला हवा. आहे ते सारे देऊन कफल्लक होण्यात काय अर्थ आहे. साहजिकच कर्जबाजारी होणे. कर्ज फेडता न आल्याने भितीपोटी आयुष्य संपविण्याचा विचार करणे अयोग्य. केलेल्या कर्माचा जमाखर्च येथेच द्यावा लागतो. कशाला तो जन्म मरण फेरा. या कथेतून आपणही अर्थबोध घेऊयात, चौर्यांशी योनीनंतर मनुष्य जन्म मिळालाय. दररोजच्या वागण्या,बोलण्यातुन, चांगल्या,वाईट कर्मातुन तयार होणारा आयुष्याचा जमाखर्च आपल्या येथेच फेडायचा आहे. बंडूतात्यांना प्रत्यक्ष महाराजांचा सहवास लाभला. विचार परिवर्तन झाले. खरंच संकटात धावून येतो तो आपला हित चिंतक. जन सुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती त्याची करावी सदैव भक्ती तो न उपेक्षी कदा तुला. श्रींची ही वाणी आपल्या सारख्या पामरांना सुद्धा मार्मिक उपदेश करते. किमान आपल्या हातून चांगले कार्य घडो.असा विचार करून तो कृतीत आणण्याचा प्रयत्न करूयात.श्रींचे नामस्मरण करूयात. म्हणूयात, श्री गजानन जय गजानन. गणी गण गणांत बोते. श्रीराम जय राम जयजय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com