संतांनी मनूष्यावर कृपा केलेली अनेक उदाहरणे पोथ्या,पुराणे,ग्रंथांतून वाचायला मिळतात. शेगांवच्या गजानन बाबांनी प्राणिमात्रावरही कृपा केली. गोविंदबुवा टाकळीकर यांचा घोडा शांत केला. तेंव्हा त्यांनी उच्चारलेल्या गणी गण गणांत बोते या मंत्राचा त्याच्या मनःपटलावर परिणाम होऊन व्दाडवृत्ती नाहिशी झाली. सुखलाल यांची गाय शेगांवात आली. तशी ही शांत झाली. तिचे साखळदंड स्वतःच्या हाताने श्रींनी काढले. तिला कायमची आपल्या सेवेत ठेवून घेतले. मठ स्थापनेवेळी बैलगाडीत बसलेले महाराजांना इच्छित स्थळी विनावाहक बैलांनी पोहोचवले. त्यांच्या सेवेत एक कुत्राही होता. कावळेही महाराजांच्या आज्ञेने वागले. मूकी जनावरे जर श्रींचे ऐकतात. तर त्यांच्यापासून मनूष्याने देखील शिकले पाहिजे. सर्वांवर प्रेम करावे.हाच तर सृष्टीचा नियम आहे. खरंच गजानन बाबांचे अवतार कार्य अक्षरशः पृथ्वीवरच्या जीवांवर कृपा करण्यासाठी होते व आहे. आजही शेगांवात दररोज श्रीं च्या आरतीला हत्ती येऊन सेवा रूजू करतो. पालखी सोहळ्यातही घोडे असतात. प्रत्येकाला श्रीं गजाननाने आपलेसे केलेले आहे. आपणही त्याचे होण्याचा किमान प्रयत्न तर करूयात, मूखी नाम घेऊयात. म्हणूयात, श्री गजानन जय गजानन. गणी गण गणांत बोते. श्रीराम जयराम जयजय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com