नैनं छिन्दन्ति शस्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारूतः
भगवद्गीतेतला हा श्र्लोक. आत्म्याची माहिती देणारा.शस्राने आत्मा मरत नाही. अग्नि जाळू शकत नाही. पाण्यात भिजत नाही की वारा वाहून नेऊ शकत नाही. शेगांवच्या श्री स्वामी गजाननानं जळत्या पलंगावर बसून गीतेतलं वर्णन सिद्ध करून दाखवलं. शब्दपांडीत्य परंतू अनुभव शुन्य ब्रह्मगिरी गोसावी यांना वास्तवाचे भान आणून दिले. नैनं छिन्दन्ति श्र्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता कां मानिता दर ह्या पलंगी बसण्याचा.? ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी.अनुभवावीण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्दपांडित्य माजले जगी अतोनात तेणेच आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी सार न तया माझारी येतुलेही गवसणार. गजानन महाराजांच्या ह्या उपदेशाने ब्रह्मगिरी भौतिक सुखापासून कायमचे विरक्त झाले. ब्रह्मगिरीं महाराजांचे भाग्य थोर. त्यांना प्रत्यक्ष गजानन ईश्वराकडून उपदेश मिळाला. मनूष्य जन्माचा अर्थ समजला. तूम्ही आम्ही आजही भौतिक सुखाच्या चक्रव्युवहात अडकलोय. हा फेरा सुटता सुटेना असा झालाय. आपल्याला आपलं संचित, प्रारब्ध, क्रियमाण उपभोगायचंय. ते भोगल्या शिवाय आपली सूटका नाही. सूटका करून घेण्याची इच्छा असली तरी ते सहजी शक्य नाही.शक्य आहे ते आपले आपण भोगून संपविणे. भोग भोगताना मात्र आपण श्रीं चे नामस्मरण करूयात, म्हणूयात, श्री गजानन जय गजानन. गणी गण गणांत बोते. श्रीराम जयराम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com