सुख,समाधान,आनंदाची इच्छा तुम्हा आम्हा सर्वांची. अर्थात ही इच्छा असावीच.कारण हे जीवन सुंदर आहे. मात्र त्याकरीता व्यवहारीक नियोजन महत्वाचे. शेगांवचे श्री गजानन म्हणत, वेळ गेल्यावर कूप खणणे निरर्थक. कूप म्हणजे विहिर. तहान लागल्यावर विहिर खणण्यात काय तो शहाणपणा. अगोदरच नियोजन असावे. संसार करताना सुद्धा विचारपूर्वक करावा. अन्यथा जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन संपुन गेल्यावरी धन सहज होते न्याय हा.अशावेळी कोण मदतीला येतो. कोणी नाही. लोक स्वार्थाकरता जवळ करतात तसेच जवळ येतात. स्वार्थ झाला की जवळही उभे करीत नाहीत. महाराजांचे भक्त म्हणविणारेही काही दांभिकही असेच. जन सुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती त्याची सदैव करी भक्ती तो न उपेक्षी कदा तूला. ईश्वरच आपल्या मदतीला धावून येतो. हं मात्र त्याला साद घालताना मनाची पवित्रता, आर्त हाक असावी. तरच तो येईल. आपल्याला तारेल. हे शक्य होईल. पण त्याही करीता हवी जोड ती नामस्मरणाची. म्हणून तर आपल्या ईश्वराला गुरूंना श्री गजानन महाराजांना साद घालूयात. म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जयराम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com