अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊनि गेली. शेगांवच्या श्री गजाननांनी बाळकृष्णबुवा रामदासी यांना दर्शन देण्याकरीता उच्चारलेला हा श्र्लोक. श्रीं च्या आणि समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनाने बाळकृष्णबुबांमधील संभ्रम नाहीसा झाला. सात्विकतेला सकारात्मक तेजाची जणू झळाळी मिळाली.अंगी निःस्वार्थता आणखीन विकसली. गजानन स्वामींनाच त्यांनी आपलं मानलं. पण तोच लक्ष्मण घूडे. त्याला स्वतःचा स्वार्थ आठवला म्हणून खजिन्याच्या उंबर्यावर जाऊन बसला. त्याच्यातला दूजाभाव पाहून महाराज त्याला म्हणाले,माझे माझे म्हणसी भलें भोग आतां त्याची फळें माझा उपाय त्यास नसे. खरंच सेवेतही माझं माझं असं काही नसावं. अहंकार व स्वार्थाने होत्याचं नव्हतं होतं. सेवा मग ती व्यक्तिगत असो की सार्वजनिक.निस्वारर्थता हवी. अन्यथा माणसे जोडण्या ऐवजी दूरावली जातात. या कथांतून घेण्यासारखी निस्वार्थ वृत्ती आहे. स्वार्थ टाकून देणेच इष्ट होय. त्याकरिता अंगी सात्विकता आणण्याचा किमान प्रयत्न करूयात.म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जयराम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com