श्री गजानन महाराजांचा धावा केला तरी आपली संकटे टळतात. असा अनेकांचा अनुभव आहे. अर्थात हे श्रद्धा, भक्तिवर अवलंबून आहे. शुद्ध , निर्मळ अंतःकरणाने हाक मारुन पहा बाबा ओ देतातच. अनेकांना त्यांनी सन्मार्ग दाखविला. श्री गजानन विजय ग्रंथात प्रत्येक अध्यायात यासंबंधीची उदाहरणे आढळतात. परंतु ज्यांचे परिवर्तन त्यांनी केले. त्यांची अंतःकरणे शुद्ध होती. काही कारणास्तव ती मंडळी बहकली होती. तरी त्यांची पुण्याई होती म्हणून त्यांचा उद्धार श्रीं नी केला. आपणही अगदी आपल्या तारुण्यांपासून श्रींचे नामस्मरण करायला हवे आहे. तरच आपलाही उद्धार होईल. पण नाम हे निष्ठेने घ्यायला हवे. आज घेतले. उद्या नाही. सोईनुसार घेणे हे काही योग्य नाही. भगवंत आपल्या मदतीला सोईप्रमाणे आला तर. मग कसे होईल. तेंव्हा हेच सांगावेसे वाटते , हेच हरीचे नामस्मरण का न केले मागे जाण प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी. श्रीं चा हा उपदेश अत्यंत अर्थवाही आहे. तो अमलात आणला तर आपल्याही आयुष्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com