श्रींच्याकडे काही मागायचे म्हणले की आपण पामर माणसं लगेच तयार होतो. वस्तूतः काहीतरी मागण्यासाठीच आपली सेवा,उपासना असते. पड्रिपूंचे अस्तित्व असल्याने मागणे हा स्वभाव ओघाओघाने येणार, हे साहजिक. हो पण मानसिक समाधानासोबत भौतिक सुखाची लालसा आपल्याला जडली असल्याने, सुखाच्या कल्पनाही निराळ्या असतात. हेच बघाना हरी जाखडे या ब्राह्मणाने शेगांवीच्या गजानन स्वामीं च्या कडे काय मागितले. तर संसार सुख. तेंव्हा आश्चर्य चकीत झालेले गजानन बाबा एकदम म्हणाले, संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया याने येथे येउनिया संसारसुख मागितले. पहा जगाची रीत कैसी अवघेच इच्छिती संसारासी सच्चिदानंद श्रीहरीसी पाहण्या न कोणी तयार. खरंतर आपल्याला चौर्यांशी कोटी योनीनंतर मिळालेला हा मनूष्य जन्म. या जन्मात स्वत्वाची ओळख करून आत्मज्ञान प्राप्ती हे उदिष्ट असावे. असे संत सांगतात. खरं आहे ते, मात्र आपल्याला ते आचरणात आणणेही अशक्य. कारण आपण सारे सुखाचे उपभोगी. असो. श्रीं गजाननाने त्या हरी जाखडे यांच्यावर कृपा केली. त्यांची इच्छा पुर्ण झाली. आपणाकडूनही निःस्वार्थ सेवा होणे किंबहूना अशक्य. क्वचितच एखादा अपवाद. आपल्या पुर्ण होण्याकरीता ती आपली उपासना, भक्ती आणि सेवा म्हणायची. प्रपंच करून तरी परमार्थ साधायचा,अल्पसा प्रयत्न करूयात. मूखाने श्री स्वामी गजानन बुवांचे नाम घेऊयात, म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जयराम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com