संतांच्या जे मनी येत ते ते पुरवी रमानाथ कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा. श्री गजानन विजय ग्रंथातील चौथ्या अध्यायातील ही ओवी. या ओवीचा प्रत्यय आजही येतो. अर्थात हे श्रद्धावानांस सहज पटेल. शेगांव असो की श्रींची सर्वत्र स्थापन झालेली मंदिरे , उपासना केंद्र असोत. श्रीं च्या ऊत्सवांत कधीच काही कमी पडत नाही. हा अनुभव अनेकांचा आहे. बाबांचे अंतःकरणापासून नाम घ्यायचे. अडचणीचे निवारण होणारच. मात्र तेथे सश्रद्ध भक्ति ही हवी. आज श्रीं च्या पारायण ग्रंथांचे सोहळे सातत्याने विविध ठिकाणी होत आहेत. शेगांवात तर श्रीं च्या गादीसमोर दररोज असंख्य पारायणे होत आहेत. श्रीं च्या इच्छाशक्तिने हे सारे घडत आहे. जागतिक पारायण दिनाचेही कौतूक म्हणावे. एकाच वेळी अगणित संख्येने ज्ञात अज्ञात व्यक्ति श्रीं स वाचनरुपी सेवा वाहतात. हे सारे काय आहे. अन्नछत्र असो, की नैमित्तिक साधना, उपासना असो, कर्ते करविते गजानन आहेत. हि भावना ज्यांच्या मनी येते ते नेहमी म्हणतात, जेथे बाळ तेथे आई तेथे दुज्याचा पाड काई आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले. भक्तिची उंची इतक्यावर असावी की ती मोजताही येणे न लगे. हा विचार आपणासर्वांस करायचा आहे. तरच संतांच्या अवतार कार्याचा उद्देश समजेल. अर्थात सुज्ञास हे सांगणे न लगे.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com