घर मालकाकारण शिपाई आडवी कोठून जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे. श्री गजानन विजय ग्रंथातील पाचव्या अध्यायात भक्ताने गजानन स्वामींना केलेली विनवणी. महाराज हे निरीच्छ वृत्तीचे होते. चराचरात त्यांचे वास्तव्य. त्यांनी कोठे जावे कोठे राहावे कोठे बसावे कोठे फिरावे कोणाशी बोलावे काय खावे ते सर्वस्वी त्यांच्यांवर अवलंबुन. भक्तांनी आपली सेवा करावी असे त्यांनी कोणाला सांगितल्याचे लिखित अथवा ज्ञात स्वरुपात नाही. सतत भटकत फिरावे. महिनोनमहिने तिकडेच राहावे. पण आपला पत्ता ते कोणालाही उमगू देत नसत. त्याही अवस्थेत त्यांचे कार्य जनसेवेचेच होते. भटकंतीत त्यांनी अनेकांचा उद्धार केला. त्याचे अनेक दाखले आजही संशोधकांना आवडतात. शेगांवची मंडळी श्रींस शोधून शोधून दमत. मात्र अंतःकरणाने हाक देताच बाबा क्षणार्धात हजर होत. अर्थात ही अंतरीची तीव्र ओढ म्हणायची. महाराज योगेश्वर त्यांना सारे काही शक्य. कोरड्या विहीरीला त्यांनी पाणी आणले. मनूष्याचे चित्त शुद्ध असेल तर ईश्वर प्राप्ति त्याच्या जिवनाचे ध्येय ठरते. भगंवंतापुढे त्याला सारे काही मिथ्या वाटते. बाबांचे भक्तही शंभर नंबरी सोनं होते. त्यांना फक्त गजाननाचा सहवास आशिर्वाद पाहिजे होता. पैसा त्यांच्यांसाठी गौण होता. होती ती निस्सिम भक्ति आणि निर्मळ प्रेम. अनेकांनी सर्वस्व श्रीं च्या चरणी अर्पण केलं. संपत्ती जमिन जुमल्यावर तुळशीपत्र ठेवलं. त्यांना हवा होता. फक्त श्रीं चा आशिर्वाद. कारण संत आणि भगवंत एकरूप साक्षात् गुळाच्या त्या गोडीप्रत कैसे करावे निराळे.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com