शंकरराव दामोदर घोटेकर, (२०६, तानाजी चौक, भसे वाडा, सिन्नर- ४२२१०३, जि. नाशिक.)
शंकररावांचा सर्वात वडील मुलगा सव्वासात वर्षाचा आहे. त्याच्या जन्मापूर्वीच त्यांनी गजानन महाराजांना नवस केला आहे. नवस करताना ते म्हणाले होते, मला मुलगा होऊ दे, मी त्याला घेऊन दर्शनाला येईन…. परंतु काही अडचणींमुळे त्यांना दर्शनाला काही जाता आलं नाही. वयाच्या एक वर्षापासूनच त्यांच्या मुलाला ताप येऊ लागला. ताप जास्त झाला की, त्याला फीट यायची . त्याची स्थिती फार वाईट झाली. बरेच डाॅक्टरी इलाज झाले. तात्पुरतं बरं वाटायचं, पण पुन्हा ताप यायचा. मुलाला जेव्हा नेहमी त्रास होऊ लागला तेंव्हा शंकररावांना नवसाची आठवण झाली. मग ते मुलामाणसांना घेऊन शेगावला दर्शनाला गेले. त्यानंतर मुलाचे सर्व आजार नाहीसे झाले. आजवर त्याला कुठलाही त्रास झालेला नाही. त्यांची महाराजांच्यावर भक्ती बसली. तेव्हापासून दर महिण्याला ते सव्वा रुपयाची मनीआॅर्डर शेगावला पाठवू लागले. पैसे पाठवण्यात खंड पडला की, घरात पुन्हा आजारपण सुरु होतं. मध्यंतरी त्यांच्या वडील मुलाचा ओठ तुटला होता… तेव्हापासून ते स्मरणपूर्वक पैसे पाठवतात. गजाननमहाराजांचा प्रसाद पोस्टानं येतो; आणि घरात अतिशय आनंदी वातावरण निर्माण होतं. घरात कुणालाही आजिरपण येत नाही.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त
शंकरराव दामोदर घोटेकर
२०६, तानाजी चौक, भसे वाडा, सिन्नर-४२२१०३, जि. नाशिक.
Jai gajanan
Shree Gajanan Jay Gajanan