सामाजिक कार्य

शैक्षणिक मदत-

दरवर्षी नाशिक महानगरमधील गरजू व होतकरू विधार्थ्याला शिक्षणासाठी रोख स्वरुपात मदत करते.   यामध्ये नाशिक महानगरपालिका- प्राथमिक- माध्यमिक शाळेतील विध्यार्थ्यांना एकूण रक्कम रु.५०००/- पर्यंत मदत केली जाते. यासाठी कार्यकारणीच्या ठरावानुसार प्रत्येक सभासदाने एक विध्यार्थाची शिफारस करून त्याला रोख स्वरुपात जून- जुलै मध्ये वाटप करण्यात येते.

विविध शिबिरे-

आपल्या संस्थेच्या वतीने आजपावतो विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

   रक्तदान व रक्तगट तपासणी

नाशिक शहरातील अर्पण रक्तपेढी ह्यांच्यातर्फे श्रीच्या प्रगटदिनी, गुरुपोर्णिमा या उत्सवाच्या वेळी रक्तदान शिबीर अयाजन करण्यात येते. आता पर्यंत १०० ते १२५ भक्तांनी/रक्तदाते ह्यांनी रक्तदान केलेले आहे तसेच, मोफत रक्तगट तपासणीसाठी ७५-१०० भक्तांचे तपसणी करून देण्यात आली आहे.

    सर्व रोग उपचार शिबीर-

डॉ श्री व सौ चिट्टीवाड हे दोघे श्री गजानन महाराजांचे भक्त आहेत. श्रीच्या माध्यमातून ह्यांचा परिचय झाल्यानंतर त्यांनी प्रगटदिन, गुरुपोर्णिमा या उत्सवात सर्व रोग उपचार तपासणी शिबीर घेऊन रुगाना मोफत औषधे, तपासणी करून सल्ला देऊन मदत केली. या शिबिराचा फायदा बऱ्याच भक्तांनी घेतला.

   नेत्र तपासणी-

नाशिक शहरात प्रसिद्ध मेंदू रोग तज्ञ डॉ संजय वर्हाडे (सोपान हॉस्पिटल) हे आहेत. डॉ श्री व सौ वर्हाडे हे दोघ्रे गजानन महाराजांचे भक्त आहेत. डॉ संजय वर्हाडे व ह्याच्या पत्नी हे दोघे नेत्ररोग तज्ञ आहेत.

ह्याच्यावातीने गुरुपौर्णिमेला नेत्र तपासणी शिबीर आयाजित केली जाते. त्यात नेत्र तपासणी, चष्मा नं., मोतीबिंदुविषयी आवशक सूचना व माहिती दिल्या जातात.

डॉ संजय वर्हाडे मेंदूतज्ञ असल्यामुळे मेदूचे आजार, फिट येणे, लकवा आदीबाबत मोफत मार्गदर्शन शिबीर घेतले जाते.

   वैद्यकीय उपचार केंद्र-

आपल्या संस्थेतर्फे व डॉ कासलीवाल- वकीलवाडी नाशिक यांच्या सहकार्याने मे २०११ पासून अत्यंत कमी दरात वैद्यकीय उपचार केंद्र राबविण्यात आले आहे. डॉ कासलीवाल ह्याच्या दवाखान्यात संस्थेच्या वतीने आले असल्यास भक्तांना अलापादरात उपचार करून देण्यात येतो.

   श्री गजानन महाराज सेवा संस्था रुग्ण सेवा केंद्र

दि ८ मे २०११ रोजी नाशिक शहरात श्रीगजानन विजय ग्रंथाचा पारायण सोहळा होता. श्रीमती शैलजा मार्तंड शुक्ल ह्याच्या सहकार्याने रुग्ण सेवा केंद्रचे उपक्रम सुरु करण्यात आले. ह्यात अपघाताने अपंगत्व आलेले, तात्पुरते व्याधी असलेलेया रुग्णांना  वॉकर, कमोड चेअर, एअर बेड, पेशंट्स कॉट, स्टीक इ. वस्तू सेवार्थ दिल्या जातात.

~वस्तू मिळण्याचे ठिकाण~

विश्वकर्मा प्रिंटर्स,४९१, दिघे बिल्डिग, घारपुरे घाट, अशोक स्तंभ, नाशिक -४२२००२

संपर्क- श्री प्रकाश दिघे ९८८१७१३८८२

वेळ- सायंकाळी ६.३० ते ७.३०

   भूषावह- आदर्श व्यक्तींचा सत्कार-

ज्या व्यक्ती धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वकील, वृत्तपर्त्रकार, प्रामाणिक विद्यार्थी-व्यक्ती आदि क्षेत्रातील भूषावह कार्य करत असलेल्या व्यक्तींचा सन २०११ पासून संस्थेचा वतीने श्रींच्या प्रगटदिनी सत्कार केला जातो.

   ऋषीपंचमीच्या दिवशी गुरुजनांचा सत्कार-

आपल्या संस्थेच्या वतीने ५ वर्षा पासून श्री वसंतराव जगताप, मानद सदस्य ह्यांचा अध्यास्खातेखाली शिक्षक गौरव समिती स्थापन करण्यात आली. यात नाशिक शहरातील प्राथमिक, माधामिक, उच्च माध्यमिक, महानगरपालिकेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक ह्यांचा सत्कात करण्यात येतो. यावेळी सत्कारार्थना प्रमाणपत्र, गौरवचिन्ह, देण्यात येते.

   दीपावली शुभेच्या

हिंदूचा महत्वाचा सण म्हणजे दीपावली होय. या दीपावली निमित्त रविवार कारंजा येथे मोठ्या आकाराचा आकाशकंदील लाऊन नागरिकांना शुभेछ्या दिल्या जातात.

   विद्यार्थांसाठी विविध स्पर्धा-

आजचे विद्यार्थी भावी काळातले श्रीचे भक्त. विध्याथांमध्ये भक्ती निर्माण व्हावी म्हणून संस्थेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते जसे नाशिक महानगस्तर – जिल्हास्तर निबंध स्पर्धा, अनुभव लेखन स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत रामायण स्पर्धा, राष्ट्र भक्तीगीत स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा आदि स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.

ह्या स्पर्धामध्ये महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी, शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गौरवचिन्ह, शालेय उपयोगी वस्तू देऊन श्रींच्या प्रगटदिनी किव्वा ऋषीपंचमीच्या दिवशी सोहळ्यात सन्मानीत करण्यात येते.

 

 शिक्षक विद्यार्थी गुण गौरव समारंभ छायाचित्रे