​भक्तांना आलेले अनुभव – योगायोग – मोरेश्वर दत्तात्रय खरे, (मधुबन अपार्टमेंट, अ-६, फर्ग्युसन काॅलेज रोड, १२२३ शिवाजीनगर पुणे ४११००४.)

भक्तांना आलेले अनुभव
योगायोग

मोरेश्वर दत्तात्रय खरे, (मधुबन अपार्टमेंट, अ-६, फर्ग्युसन काॅलेज रोड, १२२३ शिवाजीनगर पुणे ४११००४.)
१९६६ साली माझी अर्थिक स्थिती फारच वाईट होती. मला एका सदगृहस्थाने श्री गजानन महाराज यांची विजयग्रंथाची पोथी वाचण्यात सांगितलं. परंतु ती पोथी विकत घेण्याचीही माझी परिस्थीती नव्हती. १९४४ साली सदर विजयग्रंथ ही पोथी चुलत घराण्यात घेतलेली माझे आठवणीत होते. म्हणून मी माझे चुलतबहिणीस सदर पोथी आहे का, म्हणून विचारले. परंतु ती पोथी माझा चुलत पुतण्या चि. निळकंठ खेरकडे असण्याची शक्यता आहे; असे तीने मला सांगितले. त्यावरुन मी त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने मला सांगितले की सदरची पोथी आजच वरच्या फळीवरुन खाली पडली आहे. ती तू घेऊन जा. मी ती पोथी घरी आणली आणि पारायण करण्यास सुरवात केली. आजपर्यंत त्या पोथीवर माझी ५०० च्या वर पारायणे झाली असून मी आता चांगल्या सुस्थितीत आहे. पारायणे चालूच आहेत. कायमस्वरुपी वाचन चालूच अहते.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.

मोरेश्वर दत्तात्रय खेर.

मधुबन अपार्टमेंट, अ-६, फर्ग्युसन काॅलेज रोड, १२२३ शिवाजीनगर, पुणे ४११००४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.