​भक्तांना आलेले अनुभव – रमेश जयंत मुखडेकर, (२, नारायण पेठ, पुणे-४११०३०.)

भक्तांना आलेले अनुभव
रमेश जयंत मुखडेकर, (२, नारायण पेठ, पुणे-४११०३०.)
रमेशनं त्याच्या दिवंगत मामांचा अनुभव लिहिलेला आहे. त्याचे मामा दत्तात्रय रघुनाथ शिवरकर हे १९७३ साली शेगावला गेले होते. तिथून परत येताना पहाटे चार वाजता मोटार-ड्रायव्हरला क्षणभर झोप लागली. जाग येताच त्याचा धीर गेला. कारण पुढे दरी होती. परंतु गाडी पुढे न जाता आपोआप मध्ये दगड येऊन चाक गरगर फिरायला लागलं; आणि सार्‍यांच्या जिवावरचा प्रसंग टळला. घरी आल्याबरोबर दत्तोबांनी महाराजांच्या फोटोची आणि पोथीची पूजा केली. पुरणाचा नैवेद्य दाखवला. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला, महाराजांनी वानररुपात येऊन आपला आजचा नैवेद्य खावा, वानरं खरोखरच आली. परंतु त्या वानरांनी इतरांच्या पोळ्या घेतल्या नाहीत. दत्तोबांनी दिलेल्या पोळ्या लगेच घेतल्या.

     रमेश मुखेडकरांच्या मामेबहिणीचा पाय अधू होता. त्यामुळे सर्वांना तिच्या लग्नाची काळजी होती. ती नेहमी पारायण करत असे. तिचं लग्न झालं. वर्‍हाडातच अमरावतीला तिला चांगलं स्थळ मिळालं. ती मजेत आहे.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.

रमेश जयंत मुखडेकर.

२, नारायण पेठ, पुणे, ४११०३०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.