भक्तांना आलेले अनुभव
सौ. ताराबाई देशपांडे, (५६, बुधवार पेठ, लक्ष्मी रोड, गणपती चौक, पुणे-४११००१.)
सौ. ताराबाई देशपांडे या प्राख्यात प्रवचनकर्त्या आहेत. १५ मे १९७७ रोजी बाळापूर अकोल्याला त्या प्रवचनाला गेल्या. डाॅ. काकासाहेब चौधरी यांनी त्यांना ज्ञानेश्वर मंदिरात प्रवचन करण्याचं पाचारणं केलं होतं. तिकडे गेल्यावर शेगाव, कारंजा, माहूरगड या ठिकाणी जाऊन यायचं ठरलं. दि. १६ मे ते २२ मे अशी त्यांची प्रवचनं होती. त्यात एक दिवस काढून त्या शेगावला निघाल्या. सुटीचे दिवस असल्यामुळे गाड्यांना आतोनात गर्दी होती. त्यातच शेगावला जाणारी गाडी वाटेतच पंक्चर झाली.. पुढे जाण कठीण झालं. संध्याकाळच्या प्रवचणासाठी त्यांना अकोल्याला परत येणं भागच होतं. त्या मनात म्हणाल्या, महाराज आम्ही कांही तुमची सेवा केली नाही तूव्हा वाटलतर दर्शनाला न्या, नाहीतर इथुनच परत जाणं बरं ! एस. टी. मधल्या लोकांनी दिसतील त्या गाड्या थांबवायला सुरवात केली. एवढ्यात दोन अँबेसेडर गाड्या भरधाव त्या मार्गावरुन निघून गेल्या. पण त्यातली एक गाडी पुन्हा परत आली. सर्व मंडळी त्या गाडीकडे धावून गेली. परंतु मोटार-मालकान सांगितलं, आम्ही फक्त या बाईंना घेऊ. बाकीच्यिंना घेणार नाही. बाचाबाची सुरु झाली, लोक म्हणायला लागले, आम्ही एकट्या बाईला घेऊ देणार नाही. मोटार निघाली. मोटार थोडी पुढे गेल्यावर थांबली. झटकन त्या लोकांनी ताराबाईंना आणि त्यांचा बारा वर्षाचा नातू अभिजित या दोघांनाच मोटारीत घेतलं. मोटारीत अमरावतीचे कस्टमचे असिस्टंट कलेक्टर श्री. मेहता आणि अन्य बडी मंडळी होती. त्यि सर्वांनी ताराबाईंची विचारपूस केली. त्यांनी शेगावला ह.भ.प. पुरुषोत्तम पाटीलांची गाठ घालून दिली. डाॅ. चौधरी यांनी पाटलांना पत्र दिलेलचं होतं. पाटलांनी ताराबाईंना तिथे प्रवचण करायला सांगितलं. ही दुर्लभ कृपा त्यांना लाभली. प्रभु रामचंद्रांचा नैवेद्य त्यांना मिळाला. शेजारतीनंतरचा विड्याचा प्रसादही मिळाला.
१९७७ सालच्या आॅगस्टमध्ये ताराबाई साकोरीला जाऊन आल्या. तिथे त्यांना चांगला एकांत लाभला. त्या ठिकाणी त्यांनी श्री गजानन-विजय ही पोथी वाचली. तीन दिवसानंतर पोथीत फुलांच्या पाकळ्या निघाल्या. उपासनीबाबांच्या आश्रमातसुद्धा बर्याच कन्यका ही पोथी वाचतात. त्या कन्यकांनी ताराबाईंना आपले अनुभव सांगितले.
त्यात मुक्कामात ३१ आॅगस्ट १९७७ रोजी ताराबाई शिर्डीला प्रवचनाला गेल्या. तिथे दर्शनासाठी त्या श्रीसाईबाबांसमोर उभ्या राहिल्या. त्या ठिकाणी त्यांना श्रीगजानन महाराजांचं दर्शन झालं. आपल्यावर महाराजांची कृपा आहे ज्ञसं त्यांनी मनोमन जाणलं.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त.
सौ. ताराबाई देशपांडे.
५६, बुधवार पेठ, लक्ष्मी रोड, गणपती चौक, पुणे ४११००१.