आपला जन्म का आणि कशासाठी झाला आहे, याचा जेंव्हा मनूष्य बारकाईने विचार करतो. तेंव्हा काय करायचे आहे. याविषयीची त्याची ध्येय निश्चिती होते. पण हे घडणे बहुतांश वेळा दुर्मिळच. त्याचा अनुभव आपल्याला रोजच्या जीवनात येत असतो. वास्तविक मनूष्य जन्माचे सारर्थ होईल, असे मार्मिक विवेचन शेगांवी च्या स्वामी गजाननाने केले आहे. ते म्हणतात, प्रपंच मुळी अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावलीप्रत कोण सांग खरे मानी. आपण प्रापंचिक सुखाची लालसा घेउन जन्माला आलोय. परंतु या स्थितीत आपण आपल्याला आयुष्यात काय साध्य करायचे आहे, हे ठरवू शकतो. ज्याचे त्याचे कर्म निराळे आहे. मात्र त्या मार्गावरून चालताना अंतिमतः शाश्वत सत्याकडे जाण्याचा निश्चय असावा. तर मग कामातही राम दिसेल. नाम साधनेतुन चांगले विचार मनी रूजतील. सत्कर्म घडतील. आपल्या जन्माचेही मर्म समजेल.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com