पृथ्वीतलावर आलेल्या प्रत्येक मनूष्याचे कर्म ठरलेले आहे.संचित, प्रारब्ध आणि क्रियमाणानुसार तो जिवन जगत असतो. चांगले, वाईट, बरे, कडू, गोड असे अनुभव तो घेत असतो. काही माणसे राजयोगी तर काही सर्व सामान्य पद्धतीचे आयुष्य जगतात. कोणी आस्तिक कोणी नास्तिक असतात. ज्यांचे पुर्व सुकृत उत्तम त्यांचा उद्धार करण्यासाठीच संत अवतार घेतात. पण केवळ कृतकर्म भोगायला आलेल्यांविषयी मात्र मौन बाळगतात. शेगांवीचे गजानन बाबांनी हेच तर केलं. सज्जनांचा उद्धार केला. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याच्यावर कृपा केली आणि स्वतःशीच निश्चय केला. तो असा की, देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे व्हावयाचे लोकाचारी निःसंशय. तुम्हा आम्हाकारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा करणे निरालसपणे भूमिवरी. याचा अर्थ हाच की, आपल्याही प्रारब्धाप्रमाणे भगंवताची आपल्यावर कृपादृष्टी राहील. मात्र एकदा दर्शन घेऊन किंवा एकदा नाम घेऊन कृपा कशी लाभेल. तर त्याकरीता हवे सातत्य आणि सत्यनिष्ठा.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com