प्रपंच आणि परमार्थ दोन्ही भिन्न गोष्टी. त्याचे अवलोक करायचे म्हटले. तर पोथ्या पुराणे वाचून होणे अशक्य. त्यासाठी हवे आहे नामस्मरणाचे सातत्य एकदा प्रयोग तर करून पहा. सातत्याने नाम घेतल्याने काय होते ते. वाणीचा गोडवा निर्माण होण्याचे नामस्मरण हेच उगमस्थान आहे. श्रीराम म्हणा की गजानन म्हणा. भगवंताचे नाम आवडीने घ्या. तरच साधता येईल, प्रपंच करता करता परमार्थ. चालता, बोलता,उठता, बसता, लिहीता, वाचता, कर्म करता करता सतत नामस्मरण करावे, असे रामदास स्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी म्हटलंय. शेगांवचे स्वामी गजाननाने तर स्पष्ट म्हटलंय, परमार्थ करा. पण खोटे बोलू नका. बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घननिळ कृपा करितो भास्करा. श्रींनी केलेला उपदेश आजच्या काळातल्या आपल्या सारख्या पामरांना लागू पडतो. आपल्या वाणी आणि विचारात सकारात्मक बदल घडेल तो नामस्मरणाने. तरच उमगेल आपल्यातील गूण अवगुणांची अवस्था. होईल बदल वागणूकीत. तिळ आणि गूळासारखी गोडी आपोआप आपल्या जिवनात निर्माण होईल. रोजच म्हणता येईल, तिळगूळ घ्या आणि गोड बोला.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com