ईश ध्यानेन चित्तशुद्धी अर्थात ध्यान,मनन,चिंतन, नामस्मरणातुन मनूष्याचे चित्त शुद्ध होणे होय. येथे केलेल्या कर्माची अपेक्षाही नसते. असते ती फक्त चित्त शुद्धिची आस. शेगांवच्या श्री गजानन बाबांनी वज्रभूषण पंडीत यांना केलेला उपदेश असा की, कर्ममार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. मी करतो ते माझे कर्तव्य म्हटले तरी अहंकार उत्पन्न होतो. त्यापेक्षा फळाची अपेक्षा ठेवायची नाही. भक्तीवर विश्वास ठेवून नैमित्तिक उपासना सुरुच ठेवायची. परंतु उपासकानेहि मी करतो, माझ्यामुळेच सारं काही नियोजन होतं. माझ्याशिवाय कोणाच पानंही हलत नाही.मीच खरा भक्त, मीच अध्यक्ष,विश्वस्थ. आमचेच इतरांनी ऐकावे. असे विचार जेंव्हा मनाला स्पर्श करतात. तेंव्हा हातुन घडलेल्या चांगल्या कार्याची किंमत राहत नाही. मग कसे होईल चित्त शुध्द. मात्र वज्रभूषण यांचे चित्त शुध्द होते. ते त्यांच्या नैमित्तिक ईश्वर उपासनेमुळे. आपल्याला असे जमेल का?. जमेल पण प्रयत्नांची सातत्यता हवी. मुखी गजाननाचे नाम हवे. तेव्हांच भेटेल तो ज्ञाननिधी योगेश्वर. आणि आपल्याही मुखी येईल ती वज्रभूषण पंडीत यांनी स्वामींची केलेली प्रार्थना. हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी ऐसे युगायुगी किती अवतार घेशी ? झाल्यास दर्शन तुझे भवरोगचिंता नासे गजाननगुरो मज पाव आता.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com