लेखणी काढी अक्षर परि तो तिच्यात नाही जोरं, ती निम्मित्ताकारण साचार ह्या लेखनरूपी कार्याला. श्री गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात संतकवी दासगणू यांनी ओवीतून विनंम्रता व्यक्त केली आहे. जे काही घडतंय ते ईश्वर इच्छेने होय. आपली निती स्वच्छ ठेवणे होय. विचारांना सकारात्मकतेची चालना मिळावी म्हणून दिसामाजी थोडे लिहीत जावे. त्यावर चिंतन करावे. श्रींच्या खर्या भक्तांचे आपण सारे ॠण व्यक्त करायला हवे आहे. त्यांनी श्रीं च्या लिला लिहून ठेवल्यामूळे ग्रंथ साकारला. दासगणूही अत्यंत नम्रपणे म्हणत, ह्यात माझे असे काहीच नाही. कागदपत्रांच्या आधारेच ग्रंथ लिहीला. ह्या प्रमाण ग्रंथामूळेच श्रींची ओळख तूम्हा आम्हास झाली. परंतू ह्या ओळखीचे रूपांतर अंतरात्म्याशी करावयाचे असेल तर हवे श्रींचे सातत्याने नामस्मरण. लिहीताना सुद्धा नामस्मरण होतेच की. आपल्या लेखणीचा इतरांना उपयोग होइल का? का फक्त लिहायचे, आचरणात काही आणायचे नाही. असे नानाविध प्रश्न आपल्या सारख्या सामान्यांना पडतात. मात्र लिहिण्याने विचारांच्या उर्जेला चालना मिळते. ग्रंथरूपी परमेश्वर सतत आपल्या सोबत राहतो, आपले रक्षण करतो. म्हणून तर आजमितीला घडत आहेत पारायणे. जो ह्या ग्रंथांवर भाव ठेवतो. त्याच्या संकटी स्वामीराव अर्थात शेगांवचे श्री गजानन महाराज धावून जातात. स्वामींचे हे चरित्र कल्पवृक्ष आहे.ग्रंथ वाचनाने अनेकांच्या आयुष्यात नव चेतना फुलल्या आहेत. तात्पर्य हेच की चांगले विचार चांगली दिशा आणि गती देतात. त्यासाठीच तर आळस झटकून लिहीत राहावे. आपल्यामूळे इतरांचे कल्याण झाले तर बिघडले कुठे?. कारण मानसाची योजना राजहंसासाठी जाणा तैसे हे संत सज्जना मानस स्वामीचरित. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com