महाराष्ट्र ही संतांची भूमी. अनेक संत महात्म्यांनी येथे त्यांचे कर्म निश्चित केले. हे पीक संतांचे याच देशी यावयाचे वृक्ष नंदनवनीचे अन्य ठायी न येती हो. आपण सामान्य मनूष्य आहोत. आपल्याला आपला उद्धार करायचा असेल. तर सकारात्मक विचारांची जोड हवी. त्याकरीता संत विचारांचे वाचन,मनन, चिंतन असावे. तेच आपले चांगले कशात आहे, हे ओळखू शकतात. एक संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आन सत्य एक त्यांनाच कळे. संत साक्षात् ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा. पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योग आला म्हणून वृत्तीत फरक पडला खरे तेच शोधावया. शेगांवच्या गजानन महाराजांचे दर्शन झाले आणि श्रीधर काळे यांचे विचार परिवर्तन झाले. मनाची चलबिचल वृत्ती नाहीशी झाली. स्थिरता आली. आपणही श्रींच्या लिलाकार्याचे सतत मनन चिंतन केल्यास आपल्यालाही सुख,समाधान,शांतता लाभेल. आपले जीवन सुखकर होईल. दुष्ट प्रवृत्तींपासून आपले रक्षण होईल. सज्जनांचा सहवास लाभेल. मुखी सातत्याने येत राहील. ते भगवंताचे नाम. श्री गजानन जय गजानन. गणी गण गणांत बोते. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com