शेगांवचे श्री गजानन. सात्विक, विरक्त, निःस्वार्थ, तत्वनिष्ठ, समाज प्रबोधक उच्चकोटीचे संत. पवित्र भाव जपणार्यांना जवळ करणारे मात्र दांभिकतेवर कडक प्रहार करणारे संत. माळी विठोबा घाटोळ, लक्ष्मण घूडे यांना स्वामी गजाननाने त्यांची जागा दाखवून दिली. मात्र शुद्ध भक्तीभाव असलेल्यांना एवढे जवळ केले की, महाराज आणि ते खरेखरेच पवित्र भक्त एकरूप झाले. टिकाकारांमूळे पितांबर शिंपी यांना शेगांव सोडावे लागले. श्रींनीच तशी आज्ञा त्यांना केली. मात्र फार लांब जाऊ दिले नाही. जवळच कोंडोलीत पितांबर महाराजांनी वास्तव्य केले ते कायमचे. तेथील दांभिकांनी सुद्धा पितांबर महाराजांची परीक्षा घेतली. वाळलेल्या आंब्याच्या झाडाला पालवी फुटली. तेंव्हा पितांबर शिंपी यांनी अंतःकरणापासून श्रीं स साद घातली. हे स्वामी समर्थ गजानना ज्ञानांबरीच्या नारायणा पदनताच्या रक्षणा धाव आता ये काळी. महाराज पितांबर बाबांच्या पोटतिडकीने मारलेल्या हाकेला धावून गेले. ही खरी भक्ती. श्रीं शी एकरुप झालेल्या अशा भक्तांना प्रसिद्धि, मानमरातब असे काहीच नको होते. हवी होती ती फक्त साथ गजाननाची. आपणही ह्या कथेतून अर्थबोध घ्यायला हवा. सज्जनांना जवळ करू. दांभिकांना दूर ठेवू.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com