एक संतावाचून विचारांचे परिवर्तन कोणी न करू शके आन सत्य एक त्यांनाच कळे. आपले हित संतांना माहिती. एखाद्या संतावर टिका करण्यापेक्षा सत्य काय ते तपासून पहावे. शेगांवीचे श्री गजानन महाराज यांच्यावर अनेकांनी टिका केली. श्री गजानन विजय ग्रंथात त्याची उदाहरणे आढळतात. महाराजांच्या नावाखाली भक्त म्हणविणारे तेंव्हाही भांडले व आजही वादविवादाच्या फेर्यात काही जण अडकल्याचे दृष्टीस येते. विचारांचं परिवर्तन, आपल्यातील चूका, अमूक व्यक्ती पाहिजे तमूक नको अशा चूकीच्या कल्पनांपासून संतच आपल्याला परावृत्त करतील. कारण, संत साक्षात् ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा आधार जया मिळे तोच मोठा. श्रीं गजानन स्वामींचा आधार तूम्हा आम्हा सार्यांना हवा असेल. तर मुखी गजानन नाम असायला हवे. चालता,बोलता,लिहिता,वाचता,उठता,बसता, झोपेत अन् जागेपणी मुखी नामस्मरण असावे. तेच दाखवेल आपल्याला सन्मार्ग. करून देईल जाणीव आपल्या चांगल्या वाईट कर्मांची. म्हणून तर म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते. श्रीराम जयराम जय जय राम. जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com