शेगांवीचे गजानन स्वामींचे त्याही काळी अनेक शिष्य होते. त्यामध्ये सर्व प्रकारची मंडळी होती. दत्तात्रय केदार, दुधाहारी बुवा, नारायण जामकर यांनी तर श्रींच्या चरणी सर्वस्व अर्पिले. मात्र त्यांना कधीही प्रसिद्धिचा हव्यास नव्हते. त्यांनाच काय ज्यांनी ज्यांनी श्री चरणी सर्वस्व अर्पिले. त्यांना कोणाला प्रसिद्धि नको होती. पण त्यांच्या निस्सिम भक्तीमुळे प्रसिद्धि त्यांच्या मागे धावून आली. दत्तात्रय केदार हे तर उच्चशिक्षित व्यक्तिमत्व होतं. त्यांनी सरकारकारी नोकरी गाडी घोड्याचा त्याग केला आणि स्वामी गजानन सेवेत स्वतःचे आयुष्य वेचले. विदर्भात काचुर्णे येथे त्यांची समाधी आहे.गजाननमय झालेल्या केदार यांनी त्याच्या एका शिष्याला आशीर्वाद दिला की, तुला पुत्र होईल तो नाव कमवेल. झालेही तसेच, मुलगा जन्माला आला त्याने नाव कमावले ते म्हणजे दिवंगत गायक वसंतराव देशपांडे होत. गायक राहूल देशपांडे यांचे ते आजोबा होत. राहूल यांनी हे मान्य केले. असो. श्रींचे परम भक्तांचे आशीर्वाद एखाद्या परमानंद देत असतील. तर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास घडलेल्यांना श्रींनी आत्मज्ञानाचा अत्यानंद दिला असणार हे निश्चित. असो. आपले भाग्य चांगले म्हणून श्रीं च्या विषयीची माहीती मिळत राहते. अनेकांवर कृपा करणारा तो अ योनी जन्मा सत्पुरूष तो स्वामी गजानन. त्यांच्या अनंत लिला आजही अ प्रकाशित आहेत. संशोधक शोध घेतील. आपण किमान गजानन नामस्मरणाचा आनंद घेऊयात, म्हणूयात, श्री गजानन जय गजानन, गणी गण गणांत बोते, श्रीराम जय राम जयजय राम, जय जय रघूवीर समर्थ.
जय गजानन.
प्रसाद मुकुंद पाठक.
पुणे.
९९२१०९७४८२.
Email prasadpathak2710@gmail.com