भक्तांना आलेले अनुभव
सौ. प्रतिभा मुकुंद देशपांडे, (मु. पो. पुसद, जि. यवतमाळ)
या कुटुंबाची गजानन महाराजांवर अपार श्रद्धा आहे. प्रतिभाताईंचे पती मुकुंदराव हे गुरुवारचा उपवास करतात. त्यांच्या आयुष्यात जो गंभीर प्रसंग घडला तो गुरुवारीच ! काही कामानिमित्त मुकुंदराव गाडी घेऊन विश्रामगृहाकडे चालले होते. संध्याकाळी दिवेलागणीची वेळ होती. त्यांच्या घरापासून तिकडे जाताना एक वळण लागतं. ते वळण असं आहे की, समोरुन येणारी व्यक्ती दिसत नाही. त्याच वळणाच्या ठिकाणी त्यांच्या गाडीखाली एक तीन वर्षाचं मूल आलं. गाडीला ब्रेक लावण्याचे खूप प्रयत्न केले, पपण ब्रेक लागले नाहीत. मूल गाडीखाली गेलं. काय झालं ते क्षणभर कळलचं नाही. मूल जिवंत राहणं शक्यच नव्हतं. अपघात झाला त्या ठिकाणच्या समोरुनच पुष्पावती नदी वाहते. नदीच्या पात्रात उभे असलेले लोकही हतबद्ध होऊन पाहत होते; आणि मुलगा मेला असं ओरडून म्हणत होते. भलताच चित्तथरारक आणि ह्यदयभेदक प्रसंग होता. जीपगाडीतून उडी टाकून मुकुंदरावांनी बघितलं. सारे लोक गाडीभोवती गोळा झाले. गाडीच्या दोन्ही चाकाच्या पोकळीत मूल खुशाल झोपलेलं होतं. त्याला खरचटलंदेखील नव्हतं. त्याला बाहेर काढलं. आईच्या कडेवर बसून मुलगा हसत होता… महाराजांच्या या करणीनं देशपांडे पति-पत्नी हरखून गेले. हा प्रसंग कित्येक दिवस त्यांच्या स्मृतीत ताजा होता. त्या प्रसंगाची आठवण झाली तरी त्यांचं मन अत्यंत अस्वस्थ व्हायचं, पण महाराजांची कृपा आपल्यामागे आहे या श्रद्धेमुळे ते शांत व्हायचं…. पोथीच पारायण कधीही चुकत नाही.
श्री गजानन महाराजांचा एक भक्त
सौ. प्रतिभा मुकुंद देशपांडे.
मु. पो. पुसद, जि. यवतमाळ.
Jay Gajanan, Far chitt thararak anubhaw ahe. Thanks for sharing