सामुदायिक पारायण सोहळा

सन २००१ पासून म्हणजे संस्थची नोंदणी झाल्यापासून श्री गजानना महाराजांचा विजय ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यार येतो. या पारायण सोहळयाचे विशेष म्हणजे श्रीगजानन विजय मुखोतगत असलेल्या श्रीमती सुमतीताई बापट यांचे सदरातील पारायणास उत्तम सहकार्य लाभून २००१ पासूनचे पारायण सोहळे यशस्वी झालेले आहे हि विशेषबाब आहे.

संस्थेच्या वतीने वर्ष्तून किमान २ नववर्षाच्या सुरवातीचा पहिल्या आठवड्यात म्हणजे जानेवारी महिना व पवित्र श्रावणमासा मध्ये पारायण आयोजित केले जाते. या शिवाय अधिक मासातही प्रती ३ वर्षांनी पारायणाचे आयोजन केले जाते. या पारायणासाठी नाशिक शहरातून असंख्य महिला व पुरुष भाविक भक्तांचा समावेश होतो.

नवरत्नांचा पारायण सोहळा-

ह. भ. प. श्री. दासगणू विरचित श्रीगजानन विजय ग्रंथ मुखोत्गात असलेले महारास्त्र न्हुसहान नऊ भक्तांना श्रीगजानन महाराजांचा कृपाशीर्वाद असल्याची माहिती सन २००९ मध्ये माहिती झाली. त्याच प्रमाणे रविवार, दि ८ मे २०११ रोजी नाशिक शहरातील पेठे विद्यालय, नाशिक येथे हा नवरत्नांचा मुखोत्गत पारायण सोहळा संपन्न झाला.

आदरणीय श्रीमती सुमतीताई बापट (नाशिक), सौ माधुरीताई पुण्यार्थी (ठाणे), श्री जयंत मराठे (सौदापूर कर्हाड), श्री सुधारकरभाऊ दीक्षित (कल्याण), श्री. प्रकाश पटवर्धन (तळेगाव दाभाडे), डॉ. गजानन खासनीस (चिंचवड पुणे), सौ अर्चनाताई देशपांडे- कुलकर्णी , कुमारी अंजलीताई कुलकर्णी (पुणे), सौ विद्याताई पडवळ (ठाणे) हे सर्व मान्यवर एकाच व्यासपीठावर प्रथमतः नाशिकमध्ये पारायण केले. या पारायणास नाशिकमधून नव्हेतर मुंबई, दादर, पुणे आदि ठिकाणावरून भक्त मंडळीचा समावेश होता.